Krishna Janmabhoomi Case : काशीनंतर आता मथुरेतील शाही मशिदीतही होणार सर्वेक्षण; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Allahabad HC okays survey of Mathura's Shahi Idgah Mosque : अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेतील मशिदीत सर्वेक्षण करण्याबाबत मोठा निर्णय दिला आहे...
Allahabad Hc, Shahi Masjid Survey
Allahabad Hc, Shahi Masjid SurveySarkarnama
Published on
Updated on

Shri Krishna Janmabhoomi Case Update : अयोध्येतील राम जन्मभूमीचा वाद मिटला. आता अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात श्रीकृष्ण जन्मभूमीवरून निर्माण झालेल्या वादात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा आज हिंदू पक्षकारांना मोठा दिलासा दिला आहे. मथुरेतील शाही मशिद परिसरात सर्वेक्षण करण्यास उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे.

शाही मशिदीत सर्वेक्षण करण्यासाठी बऱ्याच कालावधीपासून हिंदू पक्षकारांनी बाजू लावून धरली होती. या सर्वेक्षणासाठी हिंदू पक्षकारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयात श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही मशिद वादावर सुनावणी सुरू होती. उच्च न्यायालयाने गुरुवारी 18 याचिकांवर सुनावणी घेतल्यावर हा निर्णय दिला आहे.

Allahabad Hc, Shahi Masjid Survey
Bihar Politics: बिहारच्या 50 लाख भाविकांना भाजप घडवणार अयोध्येची वारी; नियोजन सुरु

शाही मशिद परिसरात एका आयुक्ताची नियुक्ती करावी. या आयुक्ताच्या देखरेखीखाली सर्वेक्षण केले जाईल, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले. आयुक्तांच्या टीममध्ये किती सदस्य असतील? या बाबत उच्च न्यायालय 10 डिसेंबरला निर्देश देणार आहे. उत्तर प्रदेशातील काशीतील (वाराणसी ) ज्ञानवापी प्रकरणानंतर मथुरेतील शाही मशिदीत सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिका हिंदू पक्षाकडून करण्यात आली होती. या प्रकरणावर बऱ्याच कालावधीपासून जिल्हा न्यायालयापासून ते उच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढाई चालली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सहा नोव्हेंबरला आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावर गुरुवारी उच्च न्यायालयाने निर्णय दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिंदू पक्षकारांचे वकील काय म्हणाले?

अलाहाबाद उच्च न्यायालयाने आमची मागणी मान्य केली आहे. तिथे आम्ही (शाही मशिद) आयुक्तांद्वारे सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. याची रुपरेषा 18 डिसेंबरला निश्चित केली जाईल. सुनावणीदरम्यानशाही मशिदीची तर्क फेटाळून लावण्यात आले. शाही मशिदीत हिंदू मंदिराचे अनेक चिन्ह आणि प्रतीक आहेत. यामुळे वास्तविकता समजून घेण्यासाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. त्यामुळे हा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आहे, असे हिंदू पक्षाच्या वकिलांनी सांगितले.

मुस्लिम पक्षकारांचा विरोध

मुस्लिम पक्षकारांकडून सर्वेक्षणाच्या मागणीला विरोध करण्यात आला. कोर्टाद्वारे सर्वेक्षणासाठी आयुक्त नियुक्त करण्याच्या मागणीवर न्यायालय निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे, याला विरोध केला गेला. आपले तर्क मांडताना मुस्लिम पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांचा दाखला दिला गेला. तसेच ज्ञानवापी मशिदीबाबत दिलेल्या निर्णयाचाही दाखलही मुस्लिम पक्षकारांकडून दिला गेला.

edited by sachin fulpagare

Allahabad Hc, Shahi Masjid Survey
Amit Shah : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमित शाहांची 'कलम 370' वरुन विरोधकांवर प्रश्नांची सरबत्ती; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com