Cricket Player Quit Politcs : अवघ्या 10 दिवसांत 'या' किक्रेटपटूनं सोडलं राजकीय मैदान

Ambati Rayadu Quits YSRCP : राजकारणात प्रवेश केलेल्या अंबाती रायुडूचा YSR काँग्रेस पक्षाला 'जय महाराष्ट्र'
Jaganmohan Reddy, Ambati Rayadu
Jaganmohan Reddy, Ambati RayaduSarkarnama
Published on
Updated on

Hyderbad News : क्रिकेटचे मैदान गाजवलं म्हणजे राजकीय मैदानात शतक मारता येईल, अशी अटकळ असते. पण अंबाती रायुडूने ही अटकळ खोडून काढली आहे. अंबाती रायुडूनं अवघ्या 10 दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षात प्रवेश केला. पण, काय बिनसलं कुणास ठाऊक, आज सकाळी (6 जानेवारी) 10 वाजून 25 मिनिटांनी ट्विट करीत आपण राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर करून राजकीय मैदानातून माघार घेतली आहे. अंबाती रायुडू याने अचानक राजकीय संन्यास घेतल्यानं आंध्र प्रदेशमधील राजकारण ढवळून निघालं आहे.

Jaganmohan Reddy, Ambati Rayadu
Mallikarjun Kharge : एक मोदी सर्वांना भारी म्हणतात, मग हे मणिपूरला का जात नाहीत? खर्गेंचा सवाल

क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या अंबाती रायुडूने 28 डिसेंबर 2023 रोजी YSRCP म्हणजेच YSR काँग्रेस पार्टीत प्रवेश घेतला होता. मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी अंबाती रायुडू याचं जंगी स्वागत केलं होते. अंबाती रायुडू हा मूळचा आंध्र प्रदेशमधील गुंटूरचा. त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा जगनमोहन रेड्डी यांचा दृष्टिकोन वेगळा होता.

पण, अवघ्या 10 दिवसांत अंबाती रायुडूनं YSRCP ला रामराम करत असल्याचं ट्विट केलं आहे. एवढ्या कमी कालावधीत रायुडूनं राजकीय मैदान सोडल्यानं नक्की काय झालं, याची चर्चा आंध्र प्रदेशमधील राजकारणात सुरू आहे. त्याचवेळी यानंतर रायुडू दुसऱ्या कुठल्या पक्षात प्रवेश करणार का, याचीही चर्चा होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंबाती रायुडूने ट्विट करीत पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णयही जाहीर केला आहे. शिवाय भविष्यात कोणता निर्णय घेतला, तर कळवलं जाईल, हेही स्पष्ट केलं आहे.

अंबाती रायुडूने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर मे 2023 मध्ये त्याने आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली. 55 एकदिवसीय सामने आणि सहा टी-20 सामने खेळलेल्या रायुडूने किक्रेटमधील निवृत्तीनंतर राजकीय इनिंग खेळण्याचा निर्णय घेतला होता. दुर्दैवाने रायुडू राजकीय मैदानावर अयशस्वी खेळाडू ठरल्याची टीका आता होत आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Jaganmohan Reddy, Ambati Rayadu
Bengal ED Attack : 'ईडी'च्या पथकावर काल जमावाकडून हल्ला; आज तृणमूल नेत्याला अटक!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com