Bengal ED Attack : 'ईडी'च्या पथकावर काल जमावाकडून हल्ला; आज तृणमूल नेत्याला अटक!

Bengal ED Attack : '800 ते 1000 लोकांच्या जमावाने ईडी अधिकाऱ्यांना घेराव घातला.'
Bengal ED Attack
Bengal ED AttackSarkarnama
Published on
Updated on

West Bengal News : पश्चिम बंगालमधील रेशन वितरण कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच 'ईडी'ने काल छापे टाकले होते. यावेळी तपास यंत्रणेच्या पथकावरही हल्ला करण्यात आला. त्यांना मारहाण करून पळवून लावण्यात आले होते. आता तृणमूल काँग्रेसचे बोनगाव नगरपालिकेचे माजी अध्यक्ष शंकर आद्या यांना ईडीने अटक केल्याची माहिती समोर येत आहे. ईडीने शुक्रवारी त्याच्या नातेवाईकांच्या घरावर छापा टाकला होता. आद्या हे पश्चिम बंगालचे माजी अन्न मंत्री ज्योती प्रिया मलिक यांचे निकटवर्तीय मानले जातात. (Latest Marathi news)

Bengal ED Attack
Baba Balaknath Viral Video : 'बंगाल- कर्नाटकचे रेशनकार्ड बनवून घ्या'; मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बाबांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल!

काल उत्तर 24 परगणा येथील संदेशखाली येथे ईडीच्या पथकावर हल्ला झाला होता. ईडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 800 ते 1000 लोकांच्या जमावाने ईडीच्या तपास अधिकाऱ्यांना घेराव घातला. अधिकाऱ्यांना मारण्यासाठी जमाव तेथे पोहोचला असल्याचा दावा ईडीने केला आहे. तृणमूलचे दुसरे नेते संदेशखाबी यांच्या घराची झडती घेत असताना ही घटना घडली. तसेच, जमावाने ईडी अधिकाऱ्यांचे लॅपटॉप आणि मोबाईल हिसकावून घेतले. अनेक अधिकाऱ्यांच्या पाकिटातील पैसेही चोरीला गेले. गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली.

विशेष म्हणजे ईडीचे अधिकारी दोन टीममध्ये विभागून रेशन भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी निघाले होते. सकाळी एक पथक बोनगाव नगरपालिकेचे माजी अध्यक्ष शंकर आद्या यांच्या सासरच्या घरी पोहोचले. तपास यंत्रणांचा दुसरा गट संदेशखाली येथील तृणमूल नेता शाहजहान शेख यांच्या घरी पोहचले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bengal ED Attack
ED team attacked : रेड टाकायला गेलेल्या ‘ईडी’च्या टीमवर हल्ला, गाडी फोडली; अधिकारी गेले पळून...

ईडीने आपल्या निवेदनात म्हटले , 'जेव्हा शाहजहान शेखच्या मोबाइल फोनचे लोकेशन तपासले गेले तेव्हा ते घरीच होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा 800 ते 1000 लोकांच्या जमावाने ईडी अधिकाऱ्यांना घेराव घातला. ते काठ्या आणि दगड-विटा घेऊन दिसले. यावेळी अनेक अधिकारी पळून गेले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com