विमान प्रवास महागणार? विमान इंधन 17 हजारांनी महागलं; एक किलोलिटरला 1.10 लाख

विमान इंधनाच्या दरात तब्बल 18 टक्के वाढ करण्यात आली असून, ते आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत.
 Air Travel
Air TravelSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या (Crude Oil) भावाचा भडका उडाला आहे. जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 130 डॉलरवर पोचला आहे. याचा फटका आता विमान प्रवाशांना बसणार आहे. कारण विमान इंधनाच्या (Jet Fuel) दरात तब्बल 18 टक्के वाढ करण्यात आली आहे. यामुळे विमान इंधनाच्या दराने आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. यानंतर आता पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात वाढ होण्याचा अंदाज आहे.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या पार पडल्या आहेत. या निवडणुकांमुळे सुमारे चार महिन्यांहून अधिक काळ पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. असे असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल 130 डॉलरवर गेला आहे. ही भावाची मागील 14 वर्षांतील उच्चांकी पातळी आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. आता याची सुरवात विमान इंधनापासून झाली आहे. विमान इंधनाच्या दरात तब्बल 18 टक्के म्हणजेच 17,135.63 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विमान इंधनाचा दर आता प्रतिकिलोलिटरसाठी 1,10,666.29 रुपयांवर पोचला आहे. या वर्षातील ही सलग सहावी वाढ आहे.

 Air Travel
विधानसभेत गोंधळ! मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांना झापल्याने विरोधक आक्रमक

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) असल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. या निवडणुका संपल्या असून, या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका उडण्याचा अंदाज आहे. पेट्रोलचा दर प्रतिलिटर 12 ते 25 रुपये वाढण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली. मुंबईत पेट्रोलचा दर 109.98 रुपये आणि डिझेलचा दर 94.14 रुपये आहे.

 Air Travel
सरन्यायाधीशांचा दणका! विजयानंतर लगेचच योगी सरकार अडचणीत

उत्पादन शुल्क कमी केल्याने केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात 1.4 लाख कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर पाणी सोडावे लागेल. गेल्या वर्षी देशात 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या होत्या. यात काही ठिकाणी भाजपला फटका बसला. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशमध्ये बसला होता. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीरपणे याचे खापर महागाईवर फोडले होते. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे चारही उमेदवार पराभूत झाले होते. कर्नाटक आणि हरियानातील प्रतिष्ठेच्या लढतीततही भाजपला हार पत्करावी लागली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com