अमित शहांना अकाली दलाची आठवण : युतीसाठी चर्चा सुरु

पंजाब निवडणुकीसाठी भाजपची रणनीती सुरु (bjp setting agenda for punjab election)
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : पंजाब निवडणूकीच्या तोंडावर सध्या युती-आघाड्यांच्या राजकारणाने जोर धरला आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे सर्वोच्च नेते अमित शहा (Amit Shah) यांना शिरोमणी अकाली दलाची आठवण आली आहे. शनिवारी एका मुलाखतीत पंजाब निवडणुकीसाठी भाजपची रणनीती सुरु अमित शहांनी नमुद केले. पंजाबमधील युतीच्या प्रश्नाबाबत त्यांना विचारल असता ते म्हणाले, आमची कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांच्या पंजाब लोक काँग्रेस आणि आणि शिरोमणी अकाली दल (संयुक्त) या दोघांशी चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणूकांपूर्वी ही युती होण्याची शक्यता आहे.

अमित शहा पुढे म्हणाले, भाजप पंजाबमध्ये युती करुन लढण्याबाबत सकारात्मक आहे. त्या पार्श्वभूमीवर आमची कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी बोलणी सुरु आहे. तसेच आम्ही शिरोमणी अकाली दल (संयुक्त) या पक्षाचे सुखदेव सिंग धिंडसा (Sukhdev Singh Dhindsa) यांच्याशीही चर्चा करत आहोत. पंजाबची निवडणूक ही संपूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाईल, ज्याची कामगिरी चांगली असेल, तोच निवडणूक जिंकेल, असेही शहांनी स्पष्ट केले. कॅप्टन अमरिंदर सिंग पुर्वाश्रमीचे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. तर धिंडसा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत.

Amit Shah
"देवेंद्र फडणवीस मला शुभेच्छा देणार असतील, तरच माझी परवानगी..."

काही दिवसांपुर्वी पंजाबमधील नाट्यमय घडामोडींनंतर कॅप्टन अमरिंदर सिंह मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत काँग्रेसला राम राम केला होता. त्यानंतर त्यांनी 'पंजाब लोक काँग्रेस' हा स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे. आता त्यांच्या पक्षाची भाजपसोबत युती होण्याची दाट शक्यता आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह आणि भाजप यांच्यात युती झाल्यास काँग्रेसला सर्वाधिक फटका बसू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. तर भाजपचे सरचिटणीस दुष्यंत गौतम यांनी भाजप पंजाबमधील सर्व ११७ जागा लढवण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट केल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com