"देवेंद्र फडणवीस मला शुभेच्छा देणार असतील, तरच माझी परवानगी..."

देवेंद्र फडणवीस पुरविला बालहट्ट... (Devendra Fadnavis complete wish)
 Devendra Fadnavis .jpg
Devendra Fadnavis .jpg
Published on
Updated on

मुंबई : बालहट्ट आणि आपले नियमीत काम यांची सांगड घालणं कधी-कधी किती अवघड होवून बसते याचा अनुभव आज भाजपचे दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठे यांना आला. पण त्यांच्या मदतीला राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) धावून आले आणि साठेंची या कात्रीतुन सुटका झाली. यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केदार साठे यांच्या मुलीचा बालहट्ट पुर्ण केला.

त्याचे झालेले असे की, आज कोकण विभागातील विविध जिल्ह्यांच्या भाजपाच्या आढावा बैठकी होत्या. दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठे सुद्धा या बैठकीला निमंत्रित होते. पण, नेमका आज साठेंची मुलगी प्रचिती हिचा वाढदिवस होता. वडिला मुंबईला निघाल्यानंतर प्रचितीने आपल्या वडिलांना "माझा वाढदिवस आहे, बैठकीला जाऊ नका" असा हट्ट केला.

 Devendra Fadnavis .jpg
केंद्राने डोळे वटारल्यानंतर राज्याची माघार : नियमावली शिथील

पण त्यावर केदार साठे यांनी पक्षाची महत्त्वाची बैठक आहे, असे सांगत चिमुकल्या प्रचितीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावर प्रचितीनेही वेगळाच हट्ट केला. जर देवेंद्र फडणवीस काका मला शुभेच्छा देणार असतील, तरच मी बैठकीला जायला परवानगी देईन, असे सांगितले. यानंतर केदार साठे यांनी वचन दिले आणि मगच ते बैठकीला येऊ शकले.

बैठक झाल्यानंतर साठे यांनी हा प्रकार देवेंद्र फडणवीस यांना सांगितला. त्यावर फडणवीसांनीही लगेचच प्रचितीशी संवाद साधत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिचा हट्ट पुर्ण केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com