Adhir Ranjan Chowdhury : शाहांचे संसदेत दोन तास भाषण; काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींचे दोन ओळीत खणखणीत उत्तर

Adhir Ranjan Chowdhury On Amit Shah: शाहांचे भाषण संपल्यानंतर खासदार अधीर रंजन चौधरींनी सभागृहात आपला मुद्दा मांडला.
Adhir Ranjan Chowdhury and Amit Shah
Adhir Ranjan Chowdhury and Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: मोदी सरकारविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी संसदेत सरकारची बाजू मांडत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारविरोधात लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर शाह संसदेत जवळपास दोन तास बोलले. मात्र, शाहांचे भाषण संपल्यानंतर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी शाहांच्या भाषणावर फक्त दोन ओळीत उत्तर दिले.

मणिपूरमधील घटना लाजिरवाणी असल्याचे सांगत "आम्हाला लाज वाटेल अशा घटना मणिपूरमध्ये घडल्या", अशी एक प्रकारे थेट कबुलीच शाहांनी संसदेत दिली. यानंतर मणिपूरच्या घटनांबाबत बोलत मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात केलेली कामे, योजना, ईशान्य भारतातील अशांततेचा मुद्दा,'यूपीए'वर आरोप करत अनेक मुद्द्यांवर शाहांनी तब्बल दोन तास भाष्य केले.

Adhir Ranjan Chowdhury and Amit Shah
Amit Shah On Manipur Violence: आम्हाला लाज वाटेल अशा घटना मणिपुरात घडल्या; अमित शाहांची थेट संसदेतच कबुली

शाहांचे भाषण संपल्यानंतर खासदार अधीर रंजन चौधरींनी सभागृहात आपला मुद्दा मांडत "मणिपूरच्या मुद्द्यांवर पंतप्रधान बोलत नाहीत. त्यामुळे आम्ही अविश्वास प्रस्ताव आणला, जेणेकरुन पंतप्रधान यावर बोलतील. मात्र, जे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी द्यायचे असते ते कोतवाल कसंकाय देतात?", असा खोचक टोला लगावत शाहांना दोन ओळीत उत्तर दिले.

Adhir Ranjan Chowdhury and Amit Shah
Amit Shah Speech in Loksabha: जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव; अमित शाहांनी विरोधकांना सुनावलं

मणिपूरमध्ये काही दिवसांपूर्वी महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर हिंसाचाराच्या घटना देखील मणिपूरात सुरू असून यावर पंतप्रधान बोलत नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर पंतप्रधानांनी बोलावे, अशी मागणी विरोधी पक्षांची आहे. मात्र, आज अमित शाहांनी मणिपूरच्या घटनेवर भाष्य केले. यावरूनच खासदार चौधरींनी शाहांवर टिकास्त्र सोडले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com