Delhi News : राज्यात शिवसेनेला फोडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकार बनवले. वर्षातच राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याने भाजप फोडाफोडीच्या राजकारणाची प्रथा पाडत असल्याचा आरोप विरोधकांडून होत आहे. याबाबत संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. याला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पवारांवर केलेल्या आरोपांमुळे सुळेंसह विरोधक आक्रमक झाले होते. त्यांनाही शाहांनी सडेतोड उत्तर दिले. (Latest Political News)
मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत नवेदन करत नाहीत, असा आरोप करत विरोधकांनी अविश्वास ठाराव प्रस्ताव मांडला आहे. या ठरावावर दोन दिवसांपासून सभागृहात तुफान चर्चा सुरू आहे. यात सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री अमित शाह खिंड लढवताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी पक्ष भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोपाला सणसणीत उत्तर दिले. राज्यात फोडाफोडीचे राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी केल्याचा आरोप शाह यांनी यावेळी केला.
शाह म्हणाले, "खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की आम्ही महाराष्ट्रातील सरकार पाडले. असा आरोप ते वारंवार करत आल्या आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की राज्यात शरद पवारांनी सर्वात आधी सरकार पाडले. त्यावेळी त्यांनी वसंतदादा पाटलांना खाली खेचून आपले सरकार बनवले. त्यावेळी पवारांनी जनसंघाची मदत घेतली अन् पवारांनी सत्ता भोगली."
यावर सुळेंनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, "त्यावेळी एस. एम. जोशींनी मध्यस्थी केली होती. तसेच सरकार पाडले असले तरी आम्ही भाजपसोबत गेलो नाही." यावर उत्तर देताना शाहांनी सांगितले, जोशींजींनी मध्यस्थी केली असली तरी मुख्यमंत्री शरद पवारच बनले. सत्ता पवारांनीच भोगली. भाजपसोबत गेला नसला तरी जनसंघाला सरकारमध्ये बरोबर घेतले होते," असा टोलाही शाहांनी सुळेंना लगावला.
यावेळी शाह यांनी काँग्रेससह 'इंडिया'त सहभागी असलेल्या सर्व पक्षांवर निशाणा साधला. तसेच काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगली, हिंसाचारासह घोटाळ्यांचीही यादीच वाचून दाखवली. तसेच विरोधकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अविश्वास असला तरी देशातील सामान्य लोकांचा मोदींवर विश्वास असून २०२४ मध्ये तेच पंतप्रधान बनणार असल्याचा विश्वासही संसदेत अमित शाह यांनी व्यक्त केला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.