Amit Shah On Manipur Violence: आम्हाला लाज वाटेल अशा घटना मणिपुरात घडल्या; अमित शाहांची थेट संसदेतच कबुली

Manipur News: तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये तणावाचे वातावरण
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: मोदी सरकारविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी संसदेत सरकारची बाजू मांडत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शाहांनी मणिपूरमधील घटना लाजिरवाणी असल्याचे सांगत "आम्हाला लाज वाटेल अशा घटना मणिपूरमध्ये घडल्या", अशी एक प्रकारे थेट कबुलीच शाहांनी संसदेत दिली.

"मणिपूरमध्ये जी घटना घडली, त्यावर मी सविस्तर बोलू इच्छितो. विरोधी पक्षाच्या मणिपूरमधील मुद्यांशी मी सहमत असून घडलेली घटना लाजिरवाणी आहे. मात्र, यावर राजकारण करणं त्यापेक्षाही लाजिरवाणं आहे. मोदी सरकार मणिपूरवर बोलायला तयार नाही, हा भ्रम फैलावला जात असून मणिपूरवरून राजकारण करणं योग्य नाही. मणिपूर हिंसाचाराच्या घटनासंदर्भात चर्चा करण्यासाठी विरोधकांना पत्र दिले होते", असे शाहांनी सांगितले.

Amit Shah
Amit Shah On Rahul Gandhi : तेरा वेळा 'लाँचिंग' केलं पण 'फेल' गेलं; अमित शाहांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

"तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत असल्याने तणावाचे वातावरण आहे. या घटनांवरून संपूर्ण देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आता अमित शाह यांनी यावर भाष्य करत 3 मे पासून मणिपूरधील परिस्थिती बिघडलेली असून ती अद्यापही तशीच आहे", असेही शाहांनी संसदेत सांगितले.

मणिपूरमध्ये काही दिवसांपूर्वी महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला कारवाईचा इशारा दिला होता. यानंतर सरकारने तातडीने पावलं उचलत कारवाई केली. या घटनेचा तपास नंतर 'सीबीआय'कडे सोपवण्यात आला. तसेच न्यायालयानेही यावर एक समिती नेमली आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com