Operation Sindoor Debate: पाकिस्तानी दहशतवाद्यांना क्लीन चीट देणाऱ्या चिदंबरमांना शहांनी पुरावे देत धू धू धुतले

Parliament Session News: पहलगाम हल्ल्यातील हल्लेखोर हे पाकिस्तानमधील होते, याचा पुरावा काय असे सांगत चिदंबरम यांनी या दहगतवाद्यांना क्लीन दिली होती, त्यांचा हा दावा अमित शहांनी खोडून काढत त्यांच्यावर तोफ डागली.
Operation Sindoor Debate
Operation Sindoor DebateSarkarnama
Published on
Updated on
  1. ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत चर्चा सुरू असून गृहमंत्री अमित शहा यांनी पी. चिदंबरम यांच्यावर गंभीर आरोप केले.

  2. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानमधील होते, याचे पुरावे शाह यांनी सभागृहात सादर केले—त्यात पाकिस्तानी वस्तू, मतदान कार्ड आणि रायफलचा समावेश आहे.

  3. ऑपरेशन महादेव अंतर्गत तीनही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, 1055 व्यक्तींची सखोल चौकशी करून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Parliament News:संसदेत ऑपरेशन सिंदूर वर चर्चा सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात काँग्रेसचे खासदार, माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांच्यावर हल्लाबोल केला. पहलगाम हल्ल्यात 26 भारतीय नागरिकांना मृत्यू झाला होता, हा हल्ला करणारे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा पुरावा अमित शाह यांनी आज सभागृहात दिला. ऑपरेशन सिंदूरवर कालपासून लोकसभेत चर्चा सुरू आहे.

पहलगाम हल्ल्यातील हल्लेखोर हे पाकिस्तानमधील होते, याचा पुरावा काय असे सांगत चिदंबरम यांनी या दहगतवाद्यांना क्लीन दिली होती, त्यांचा हा दावा अमित शहांनी खोडून काढत त्यांच्यावर तोफ डागली. पहलगामचे हल्लेखोर हे पाकिस्तानचे होते, याचे पुरावे अमित शहांनी आज सभागृहात दिले. या दहशतवाद्यांजवळ आढळलेले चॅाकलेट, वस्तू या पाकिस्तानच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे शाह यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असल्याची माहिती अमित शाह यांनी लोकसभेत दिली. ऑपरेशन महादेवअंतर्गत भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारले. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती त्यांनी दिली.

Operation Sindoor Debate
Rahul Patil: राहुल पाटलांचे ठरलं! अजितदादाचं 'घड्याळ' बांधणार; भोगावतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानचे होते, हे कशावरुन असा प्रश्न चिदंबरम यांनी केला होता. त्यांना शहांना खडे बोल सुनावले. चिदंबरम असे विधान कुणाच्या सांगण्यावरुन करीत आहेत, कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा सवाल शहा यांनी उपस्थित केला. तीनपैकी दोन दहशतवाद्यांच्या मतदान कार्डाचे क्रमांक आमच्याकडे असून ते पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी वापरलेल्या रायफल आणि चॉकलेट हे पाकिस्तानी असल्याचे तपासात आढळले आहे.

तपास यंत्रणेने एकूण 1055 व्यक्तींची सुमारे 3 हजार तास चौकशी केली आहे. त्याबाबतचे अनेक व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत. त्याआधारे स्केच तयार करुन बशीर आणि परवेज यांची ओळख पटविण्यात आली. त्यांनी हल्ल्याच्या पहिल्या दिवशी दहशतवाद्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. त्यांना अटक करण्यात आली असल्याचे शाह म्हणाले.

Q1. ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय?
हे एक विशेष सैनिकी ऑपरेशन आहे ज्यात पहलगाम हल्ल्याच्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आली.

Q2. पहलगाम हल्ल्यात कोण सहभागी होते?
अमित शाह यांच्या मते, पाकिस्तान समर्थित दहशतवादी सहभागी होते.

Q3. अमित शाह यांनी पी. चिदंबरम यांच्यावर कोणता आरोप केला?
त्यांनी दहशतवाद्यांना क्लीन चिट दिल्याचा आरोप केला.

Q4. ऑपरेशनमध्ये काय निष्कर्ष मिळाले?
तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि स्थानिक सहकार्य करणाऱ्यांना अटक झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com