Amit Shah Interview : राहुल गांधी न्यायालयात जाऊ शकले असते, पण इतकी मुजोरी येते कुठून? अमित शाहंचा सवाल!

Rahul Gandhi News : "गांधी घराणं धोक्यात आले की लोकशाही धोक्यात येते का?"
Amit Shah : Rahul Gandhi
Amit Shah : Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

National Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सडकून टीका केली आहे. खासदारकी रद्द होऊन इतके दिवस उलटून गेले,पण अजूनही राहुल गांधी आपल्यावरील कारवाईविरोधात न्यायालयात गेले नाहीत. ते या सगळ्याचा दोष पंतप्रधान नरेंद्र मोदींना देतात. राहुल गांधींकडे इतकी मुजोरी येते कुठून? अशा शब्दात शाह यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला.

Amit Shah : Rahul Gandhi
BV Srinivas Defamation Notice: स्मृती ईराणींना 'डार्लिंग' म्हणणं काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या अंगलट; Video पाहा; डार्लिंग बना कर…

खासदारकी रद्द होण्याचं हे पहिलं उदाहरण नाही. या आगोदर ही राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव, काँग्रेस नेते राशीद अल्वी, राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जय ललिता यांच्यासह १७ जणांची खासदारकी किंवा आमदारकी रद्द झाली आहे. पण यापैकी कोणीही काळे कपडे परिधान करून निषेध केला नाही. लोकशाही धोक्यात आल्याची ओरड ही केली नाही. मग राहुल गांधी कशासाठी इतका बाऊ करतात? असा सवाल गृहमंत्री शाह यांनी विचारला आहे. एका माध्यमसमूहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

गृहमंत्री शाह म्हणाले, "राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली, त्याच क्षणी त्यांचं संसद सदस्यत्व गेले. राहुल गांधी यांनी तातडीने न्यायालयात जाणे गरजेचे होते. मात्र ते अद्यापही न्यायालयात गेले नाहीत. इतकी मुजोरी येते कुठून असा मला प्रश्न पडतो. गांधी घराणं धोक्यात आले की लोकशाही धोक्यात येते का? ज्यामुळे खासदारकी गेली, तो न्यायालायाचा निर्णय २०१३ चा आहे. या निर्णयामुळे आतापर्यंत १७ सदस्यांची खासदारकी गेली आहे. त्यापैकी कुणीही पंतप्रधान मोदींवर आरोप केलेले नाहीत. गुजरातचा गृहमंत्री असताना खोट्या केसमध्ये मला तुरूंगात पाठवलं. पण आम्ही काळे कपडे परिधान करून आंदोलनं केली नाहीत."

Amit Shah : Rahul Gandhi
Devendra Fadnavis On Riot: '' काही नेते भडकवणारे...''; छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचारावरुन फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

"ते कायदा वाचणार नाहीत, त्यांना समजणारही नाही. पण काँग्रेसकडे राज्यसभेत बसणारे मोठे वकील आहेत, ते ही काही समजावत नाही. लोकसभा अध्यक्षही काही करू शकत नाहीत. ज्या वेळी तुम्ही दोषी ठरलात, तेव्हाच तुमचं सदस्यत्व गेलं," असे ही अमित शाह म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com