Amit Shah : आता काश्मीरचंही नाव बदलणार?; अमित शहांच्या 'त्या' वक्तव्याने चर्चांना उधाण!

Kashmir Renaming : जाणून घ्या, गृहमंत्री अमित शाह यांनी नेमकं काय म्हटलं आहे? एका ऋषींच्या नावाचाही केला आहे उल्लेख
Amit Shah
Amit Shah Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: भारतात अनेक शहरांच्या नावांमध्ये बदल केला गेला आहे आणि होतही आहे. त्यात आता काश्मीरच्या नावाचीही भर पडण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण, आहे गृहमंत्री अमित शाह यांचं एक वक्तव्य. गृहमंत्री अमित शाह यांच्या एका वक्तव्याने याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

गुरुवारी गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी म्हटले की, मला आनंद आहे की आज काश्मीर पुन्हा एकदा आपल्या भूसांस्कृतिक राष्ट्र भारताचा अभिन्न अंग बनून भारतासोबत विकासाच्या मार्गावर आहे. या ठिकाणी लोकशाही प्रस्थापित झाली आहे. शाह यांनी सांगितले की, मला विश्वास आहे की जे काही आम्ही गमावले, ते आम्ही लवकरच मिळवू. शाह यांनी 'जम्मू-कश्मीर एंव लद्दाख: सातत्य और सम्बद्धता का ऐतिहासिक वृतांत' पुस्तक प्रकाशनावेळी महिर्षि कश्यप यांचा उल्लेख केला.

अमित शाह नेमकं काय म्हणाले? -

गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की, काश्मीर भारताच भाग होता, आहे आणि राहील. तो वेगळा करण्याचा प्रयत्न काहींनी केला होता, परंतु ती अडचणही दूर केली आहे. इतिहास लुटियंस दिल्लीत बसून नाही लिहिला जात, तो तिथे जाऊन समजून घ्यावा लागतो. शासकांना खूश करण्यासाठी इतिहास लिहिण्याचा काळ गेला आहे.

Amit Shah
One Nation One Subscription Scheme : नेमकी काय आहे 'वन नेशन वन सब्सक्रिप्श' योजना अन् कुणाला मिळणार लाभ?

तसेच, मी भारतातील इतिहासकारांना आवाहन करतो की, प्रमाणाच्या आधारावर इतिहास लिहा. पुढे अमित शाह म्हणाले, अम्ही जाणतो की काश्मीरला कश्यपांच्या भूमीच्या नावाने ओळखले जाते, कदाचित असं असू शकतं की त्यांच्या नावावरूनच काश्मीर नाव पडलं असेल. असंही ते म्हणाले.

Amit Shah
New York Nightclub Attack : अमेरिकेत अवघ्या 24 तासांत चौथा मोठा हल्ला; न्यूयॉर्कच्या नाइट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार!

यावेळी अमित शाह यांनी काश्मिरच्या दहा हजार वर्ष जुनी संस्कृती आणि इतिहासाचाही सविस्तरपणे उल्लेख केला. त्यांनी म्हटले की गुलामीच्या काळात आपल्या गौरवशाली इतिहासाला षडयंत्र म्हणून मिटवलं गेले. तर पुस्तकाबाबत शाह यांनी सांगितले की, यामध्ये बौद्ध धर्म यात्रा, सिंधु-सरस्वती सभ्यतेचाही उल्लेख केला आहे. तसेच काश्मिरमध्ये सर्व धर्मांना स्थान मिळाल्याचंही यावेळी शाह यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com