अमित शहांनी त्यांच्या भाषेत राणेंची समजूत काढली आणि सावंतांचे नाव फायनल झाले..

Goa news | Pramod Sawant| Amit Shah| गोव्यातील सावंत यांच्या नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री नसतील असे समजते.
Vishwajit Rane| Amit Shah| Pramod Sawant
Vishwajit Rane| Amit Shah| Pramod SawantSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : गोव्यात भारतीय जनता पक्षाला कधी नव्हे इतक्या २० जागा मिळवून देण्याच्या मोहीमेचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याकडेच मुख्यमंत्रीपदाची सूत्रे कायम ठेवण्याचा निर्णय भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. सावंत यांनी काल मध्यरात्री गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतल्यावर त्यांच्या गोव्यातील निकटवर्तीयांना ‘ मागील पानावरून पुढे चालू... शपथविधीसाठी गोव्यात येत आहे,‘ असा संदेश त्यांच्या गोटातून देण्यात आला. या पदासाठी विश्वजित राणे यांचेही नाव चर्चेत होते. ते ऐनवेळी आग्रही झाले होते. पण शहांनी त्यांच्या भाषेत राणेंना समजावले. त्यातून सावंत यांच्या मार्गातील अडसर दूर झाला.

दरम्यान, मणीपूरमध्येही एन. बीरेन सिंग यांच्याकडेच सूत्रे कायम ठेवण्यात येणार आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तेथील मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स कायम आहे. गोवा व मणीपूरमध्ये १९ व २० मार्चच्या आसपास नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. गोव्यातील सावंत यांच्या नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री नसतील असे समजते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सावंत व बीरेन सिंग यांच्याशी चर्चा केली. उत्तराखंडचे काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याशी अमित शहा व जे पी नड्डा यांनी चर्चा करून त्या राज्यातील पुढील मुख्यमंत्र्यांबाबत ‘विचार सुरू आहे‘ चा मेसेज दिला.

Vishwajit Rane| Amit Shah| Pramod Sawant
हेमा मालिनी यांचा मोदी सरकारला संसदेतच घरचा आहेर; म्हणाल्या...

गोव्याच्या ४० सदस्यीय विधानसभेत दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालीही भाजपला जास्तीत जास्त १३ जागा मिळाल्या होत्या. पंतप्रधान मोदी यांचा चेहरा, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीती, शहा यांचे ‘मायक्रो‘ व्यवस्थापन व मुख्य म्हणजे राज्यात सावंत यांच्या नेतृत्वाखाली यंदा भाजपने इतिहासात सर्वाधिक २० जागा मिळवल्या. राज्यातील भाजपचा मतांची टक्केवारीही ३३.३१ इतक्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. मात्र विश्वजित प्रतापसिंग राणे व माविन गुदिन्हो आदी इच्छुकांनीही मुख्यमंत्रिपदासाठी हालचाली सुरू केल्याने गोव्यातील गूढ वाढले होते. राज्यातील सत्ता येणार हे निश्चित होऊन ५ दिवस उलटले तरी भाजपने राज्यपाल पी.एस श्रीधरन पिल्लई यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा दाखल न केल्याने सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

फडणवीस यांनी अगदी सुरवातीपासूनच सावंत यांनाच निसंदिग्धपणे आपला कौल दिला होता. केंद्रीय मंत्री सर्वश्री नरेंद्र तोमर व एस. मुरूगन या भाजप पर्यवेक्षकांनीही आपले फीडबॅक दिल्लीत सादर केले होते. त्यानंतर सावंत यांचा मार्ग अधिकाधिक प्रशस्त होत गेला. काल रात्री दिल्लीत पोचलेले सावंत आजही निश्चिंत दिसत होते. पक्षसूत्रांच्या माहितीनुसार गोव्याचा निकाल लागल्यावर सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला तेव्हा मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करतानाच, ‘ प्रमोदजी आपल्याला स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर गोवा‘ ही योजना आणखी वेगाने सुरू ठेवायची आहे,‘ असे स्पष्ट सांगितले होते. त्यानंतर सावंत यांनाच पक्षनेतृत्वाने काल दिल्लीत बोलावून घेतले तेव्हाच पुन्हा हे पद मिळण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले होते.

Vishwajit Rane| Amit Shah| Pramod Sawant
मोदींनी दोन्ही दावेदार दिल्लीत बोलावले अन् माळ जुन्याच मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात घातली

सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे व प्रदेश संघटनमंत्री सतीश धोंड यांच्यासह सावंत यांनी काल मध्यरात्री शहा व नड्डा यांच्याशी चर्चा केली. त्याआधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतही हे दोन्ही नेते सहभागी झाले होते. याच दरम्यान शहा यांनी हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल पण मूळचे गोव्याचे असलेले राजेंद्र आर्लेकर यांच्याशीही चर्चा केली.

सावंत यांनी आज पंतप्रदान मोदी यांची संसदेत भेट घेतली. सुरवातीची चर्चा झाल्यावर अन्य नेते बाहेर गेले त्यानंतरही पंतप्रधानांनी सावंत यांच्याशी एकट्याशी बातचीत केली. त्यातही ‘आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण गोवा‘ या योजनबाबत मोदींनी सावंत यांना काही टिप्स दिल्याचे समजते. नाराजी वगैरेची चिंता तुम्ही करू नका, ते आम्ही पहातो, अशा शब्दांत शहा यांनी सावंत यांना आश्वस्त केल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com