Amit Shah and Devendra Fadnavis : अमित शाहांनी फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय!

Devendra Fadnavis Meet Amit Shah : महाराष्ट्रातील भाजपच्या खराब कामगिरीची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारत सरकारमधील पदावरून मला मुक्त करावे, अशी मागणी फडणवीसांनी पक्ष श्रेष्ठींकडे केली होती.
Devendra Fadnavis Meet  Amit Shah
Devendra Fadnavis Meet Amit Shah Sarkarnama

Devendra Fadnavis decision to resign : लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर जरी एनडीए आघाडीला बहुमत मिळालं असलं, तरी भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्यात यश आलेलं नाही. त्याचप्रमाणे राज्यातही भाजपला मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मोठा फटका बसला आहे. यंदा महाराष्ट्रात भाजपला लोकसभेच्या केवळ 9 जागांवर यश मिळालं आहे.

भाजपच्या खराब कामगिरीची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारत सरकारमधील पदावरून मला मुक्त करावे अशी मागणी फडणवीसांनी पक्ष श्रेष्ठींकडे केली होती. मात्र त्यांची ही मागणी भाजप श्रेष्ठींनी फेटाळल्याची माहिती समोर आली आहे.

फडणवीसांच्या या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या निर्णयास प्रदेश भाजपकडून विरोधही दर्शवला गेला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे राज्य सरकारमध्ये हवे आहेत, असे म्हणत त्यांनी राजीनामा देऊ नये असा आग्रही केला. मात्र फडणवीस आपल्या निर्णयावर ठाम होते आणि त्याच कारणासाठी ते दिल्लीत पक्ष श्रेष्ठींच्या भेटीसाठी दाखल झाले होते. अखेर अमित शाह यांनी देखील फडणवीसांना राजीनामा न देण्याचा सल्ला देत, काम सुरूच ठेवण्याचा दिल्याची माहिती समोर आली आहे.

Devendra Fadnavis Meet  Amit Shah
Devendra Fadnavis : फडणवीसांना सरकारमधून पक्षश्रेष्ठी 'मोकळे' करणार? दिल्लीत हालचालींना वेग

परिणामी तुर्तास तरी फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवरच पडला आहे. त्यांना आपलं काम सुरूच ठेवण्याचे निर्देश पक्ष श्रेष्ठींकडून देण्यात आले आहेत. तुमचे काम सुरु ठेवा, पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्यानंतर सविस्तर बैठकीत चर्चा करू, असा अमित शाह(Amit Shah) यांचा देवेंद्र फडणवीस यांना सल्ला असल्याचीही माहिती समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेतली. राजीनाम्याबाबत कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुसर्‍या भेटीत पूर्ण झाली आहे.

Devendra Fadnavis Meet  Amit Shah
Devendra Fadnavis: फडणवीस जिगरबाज नेते, त्यांनी पळून जावू नये…, काँग्रेसच्या नेत्याकडून कौतुक की टोला?

प्राप्त माहितीनुसार फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, सध्या तुम्ही तुमचे काम सुरु ठेवा. नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय करु.

महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करु. पण, तोवर तुम्ही आपले काम सुरु ठेवा, असे अमित शाह यांनी फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मला मोकळे करा, अशी विनंती केल्यानंतर आजच्या अमित शाहांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले होते. पण, आजच्या बैठकीनंतर फडणवीसांच्या विनंतीवरील निर्णय तुर्तास लांबणीवर पडला असल्याचे दिसते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com