Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आहेत. जिगरबाज नेते आहेत, त्यांनी पळून जावू नये, असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीची खिल्ली उडवली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर देशासह राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट झाली असून मागील लोकसभेच्या तुलनेत यंदा कमी जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत.
राज्यातील याच अपयशाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वीकारत आपल्याला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायचा असल्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. शिवाय यावेळी त्यांनी पक्षाला मी, मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विनंती करणार असल्याचंही सांगितलं. फडणवीसांच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे.
फडणवीसांच्या वक्तव्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, "देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आहेत. जिगरबाज नेते आहेत. त्यांनी पळून जावू नये. राज्यात 22 जागांवरुन त्यांनी 9 जागेवर भाजपला आणलं आहे. लोकसभेला जसा निकाल आला तसाच निकाल विधानसभेला येईपर्यंत त्यांनी थांबावे. ते पळून जाणारे नेते नाहीत. दोन पक्षांच्या जिवावर ते सरकार बनवून ते काम पाहत आहेत. त्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही. विरोधी पक्षाला त्यांनी खिळखिळं केलं आहे." अशा शब्दात वडेट्टीवार यांना टोला लगावला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी मी स्वत: स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्णवेळ काम करायचं आहे. त्यासाठी मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विनंती करणार आहे. मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.