श्रीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) सध्या जम्मू व काश्मीरच्या (Jammu-kashmir) तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सोमवारी त्यांचा अखेरचा दिवस आहे. पण मागील दोन दिवस त्यांनी काश्मीरमधील अनेक विकासकामांच्या उद्घघाटनांसह राजकीय व इतर कामांचा आढावाही घेतला आहे. रविवारी त्यांनी जम्मूतील काही स्थानिकांच्या घरी जात त्यांची भेट घेत धक्का दिला.
जम्मूतील मकवाल सीमेवरील नागरिकांच्या घरी शहा यांच्यासह नायब राज्यपाल मनोज सिन्ही हेही उपस्थित होते. एका नागरिकाच्या घरी गेल्यानंतर शहा यांनी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याबाबतचा व्हिडीओ एका वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. यामध्ये शहा हे एका व्यक्तीच्या शेजारी बसल्याचे दिसत असून मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करत आहेत. ते आपल्या मोबाईलमध्ये त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक टाईप करत होते.
शहा यांनी त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक तर घेतलाच शिवाय त्याला आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांकही दिला. तसेच कधीही गरज वाटेल तेव्हा फोन करा, असंही शहांनी त्या व्यक्तीला सांगितल्याचे वृत्तसंस्थेने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, शहा यांनी रविवारी मकवाल सीमेवर जवानांशीही संवाद साधला. जम्मूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या नवीन कॅम्पसचे उद्धघाटनही शहा यांनी केले.
दरम्यान,जम्मू व काश्मीर (Jammu and Kashmir) विशेष दर्जा देणारे कलम 370 (Article 370) हटवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) शनिवारी पहिल्यांदाच राज्यात दाखल झाले. तीन दिवसांच्या दौऱ्यात शहा यांच्याकडून विविध विकासकामांच्या उद्घाटनाबरोबरच सुरक्षा व राजकीय स्थितीचा आढावाही घेतला जाणार आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी लगेचच राज्याचा रोडमॅप सांगत मोठी घोषणा केली.
शहा म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये परिसमीन होईल, निवडणूकही होईल आणि पुन्हा राज्याचा दर्जाही मिळेल, असं शहा यांनी स्पष्ट केलं आहे. कलम 370 रद्द करणे अपरिवर्तनीय आहे. काश्मीरमधील युवकांवर दहशतीचे सावट होते. आता हे युवक बदलाची भाषा करत आहेत. खेळ आणि पर्यटनाशी युवकांना जोडले जात आहे. खेळच युवकांना विजय आणि परायय शिकवत असतो.
शहा यांनी माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, मागील 70 वर्षांत देशाला काय मिळाले, यावर मी बोलू इच्छित नाही. पण 70 वर्शांत काश्मीरला सहा खासदार आणि तीन कुटुंब मिळाली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांपर्यंत लोकशाही घराणेशाहीच्या कचाट्यात होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.