वानखेडेंच्या पाठिशी पत्नी क्रांती खंबीरपणे उभी; दिलं सडेतोड प्रत्युत्तर

किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केलेल्या खुलाशांमुळे खळबळ उडाली आहे.
Kranti Redkar and Sameer Wankhede
Kranti Redkar and Sameer WankhedeFile Photo
Published on
Updated on

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळी वळणे घेत आहे. या प्रकरणातील पंच किरण गोसावीच्या बॉडीगार्डने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर वानखेडे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहित पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे. रविवारच्या घडामोडींतर वानखेडे यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकरनं सोमवारी सकाळी सूचक ट्विट केलं.

किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केलेल्या खुलाशांमुळे खळबळ उडाली आहे. आर्यनला एनसीबीने पकडल्यानंतर त्याच रात्री गोसावी व सॅम नावाचा व्यक्ती शाहरुखच्या मॅनेजरला भेटले होते. त्यावेळी त्यांच्या पैशांची बोलणी झाली होती. त्यानंतर सकाळी एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये घेतल्याचा खुलासा बॉडीगार्ड साईलने रविवारी सकाळी केला होता. त्यानंतर एनसीबीने पत्रक काढून हा दावा खोटा असल्याचा म्हटलं.

Kranti Redkar and Sameer Wankhede
गोसावीच्या बॉडीगार्डच्या बॉम्बनंतर वानखेडेंचे 'ते' शब्द मलिकांनाही आठवले!

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून वानखेडे यांच्यावर सतत आरोप केले जात आहेत. रविवारी आर्यन खान प्रकरणातील एका पंचानेच थेट आरोप केल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. त्यानंतर सोमवारी सकाली क्रांतीने या प्रकरणावर भाष्य करणारं ट्विट करून वानखेडे यांच्यावर होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

'तुम्ही प्रवाहाच्या विरूध्द पोहण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला बुडण्याची भीती वाटू शकते. पण जर देव तुमच्यासोबत असेल तर जगातील कोणतीही मोठी लाट तुम्हाला बुडवू शकत नाही. कारण त्यालाच सत्य माहित आहे. शुभ सकाळ. सत्यमेव जयते,' असं सूचक ट्विट क्रांतीने केलं आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांनी रविवारी (ता. २४ ऑक्टोबर) सायंकाळी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहेत. त्यात वानखेडे यांनी म्हटले आहे की, मला ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ नये, कारण, हे प्रकरण आता माझ्या वरिष्ठांकडे सोपविण्यात आलेले आहे. मला तुरुंगात टाकण्याचा आणि नोकरीतून काढून टाकण्याच्या धमक्या काही लोकांकडून यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत, असे सांगून त्यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

पत्रात वानखोडे यांनी पुढे म्हटले आहे की, हे प्रकरण डीडीजी यांनी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवले आहे, त्यामुळे पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जाऊ नये. मुंबई पोलिस आयुक्तांबरोबरच ह्या पत्राची कॉपी पोलिस महासंचालकांनाही देण्यात आलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com