Amit Shah's Big Statement: अमित शाह यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले,'' नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर...''

BJP Vs Congress : ...तर राहुल गांधींची खासदारकी वाचली असती!
Narendra Modi - Sonia Gandhi - Amit Shah
Narendra Modi - Sonia Gandhi - Amit ShahSarkarnama

Amit Shah News : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमधील एका कथित बनावट चकमक प्रकरणात अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला होता असा गौप्यस्फोट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.

गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द होण्यापासून ते अनेक मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारवर देखील गंभीर आऱोप केले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात कथित बनावट चकमक प्रकरणात नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी सीबीआय माझ्यावर दबाव आणत होती. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तुम्ही टेन्शन घेऊन नका,नरेंद्र मोदीं(Narendra Modi)चं नाव सांगून टाका असं त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं. त्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता असा खुलासा शाह यांनी केला आहे.

Narendra Modi - Sonia Gandhi - Amit Shah
NCP News : आव्हाडांचं सूचक Tweet ; मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार, जेलमध्ये सडवणार, मी तीन वर्ष अनुभवतोयं..

...तर राहुल गांधींची खासदारकी वाचली असती!

काँग्रेस नेते भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही व्यक्तीला 2 वर्षांची शिक्षा झाली तर प्रत्येक व्यक्तीला शिक्षेला आणि दोषाला स्टे करायला 3 महिन्यांचा वेळ मिळायचा. कनव्हिक्शन स्टे करता येत नाही, शिक्षा स्टे करता येते. पण थॉमस केसमध्ये सुप्रीम कोर्टाने 3 महिन्यांचं प्रावधान काढून टाकलं.

लालूंना वाचवण्यासाठी मनमोहन सरकार अध्यादेश घेऊन आले. पण तो अध्यादेश राहुल गांधींनी फाडला. तो अध्यादेश असता तर राहुल गांधींची खासदारकी वाचली असती असंही शाह यावेळी म्हणाले.

Narendra Modi - Sonia Gandhi - Amit Shah
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा ; राम मंदिराबाहेरची कमान जाळली..

...तेव्हाच तुमचं सदस्यत्व गेलं!

तसेच अमित शाह यांनी देशाच्या एका व्यक्तीसाठी कायदा बदलायचा का? असा सवाल देखील राहुल गांधीं(Rahul Gandhi)च्या बाबत उपस्थित केला. शाह म्हणाले, अजूनही या निकालाला आव्हान दिलेलं नाही, त्यांच्यात कोणता अहंकार आहे? लालू प्रसाद यादव, जयललिता, राशिद अल्वी यांच्यासह 17 जणांची खासदारकी गेली. पण कुणीही काळे कपडे घातले नाहीत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे अशीही भूमिकाही स्पष्ट केली.

ते कायदा वाचणार नाहीत, त्यांना समजणारही नाही. पण काँग्रेसकडे राज्यसभेत बसणारे मोठे वकील आहेत, तेही काही समजावत नाही. लोकसभा अध्यक्षही काही करू शकत नाहीत. ज्या वेळी तुम्ही दोषी ठरलात तेव्हाच तुमचं सदस्यत्व गेलं असं अमित शाह म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com