Maharashtra Politics: माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ टि्वट करीत मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे. आव्हाडांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
जितेंद्र आव्हाडांनी या प्रकारावरून सूचक शब्दांत सरकारवर संताप व्यक्त केला आहे. “हे सगळं मी गेले तीन वर्षं अनुभवतो आहे. गेले ३५ दिवस तर सगळ्या मर्यादा पार”, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.आव्हाडांनी व्हिडिओ टि्वट करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका घटनेची आठवण करुन दिली आहे. मुख्यमंत्र्यांवर आव्हाडांनी निशाणा साधला आहे.
या व्हिडिओमध्ये दोन जण एका व्यक्तीला मारहाण करीत आहे, मुख्यमंत्री शिंदे यांची माफी मागण्यास सांगत आहेत. मारहाण करणारे व्यक्ती हे शिवसेनचे पदाधिकारी असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
“आमच्या साहेबांबद्दल तू का बोलतोस?”
खुर्चीवर बसलेल्या एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसते. सोशल मीडियावरची एक पोस्ट डिलीट करून माफी मागण्यासही हे लोक सांगत आहेत. “आमच्या साहेबांबद्दल तू का बोलतोस?” असा प्रश्नही मारहाण करणारे त्याला विचारत आहेत.
“शिंदे साहेबांची जाहीर माफी मागतो”
मारहाण झाल्यानंतर त्या व्यक्तीने त्यांच्यासमोर सोशल मीडियावरची ती पोस्ट डिलीट करून “शिंदे साहेबांची जाहीर माफी मागतो”, असं म्हटल्यानंतरच त्याची मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून सुटका होते, असे या व्हिडिओमध्ये दिसते.
पोलीस छळणार .. जेल मध्ये सडवणार...
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्यावर आक्षेपार्य पोस्ट करणारा काँग्रेस ठाणे प्रवक्ता गिरीश कोळी ह्याला शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर व त्यांचे सहकारी शिवसैनिक ह्यांनी चोप दिला तसेच ती आक्षेपार्य पोस्ट डिलीट करण्यात आली व माफी मागितली….हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्या साठी कार्यकर्त्यांनी केले तर ते गुंड .. मग पोलिस छळणार .. स्वत: मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करणार … जेल मध्ये सडवणार. हे सगळे मी गेले तीन वर्ष अनुभवतो आहे .. आणि मागचे ३५ दिवस तर सगळ्या मर्यादा पार .. असे टि्वट आव्हाडांनी केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.