Nadda Attack Gehlot Sarkar : राजस्थानमध्ये मणिपूरसारखी घटना, गेहलोत सरकारला जनता शिकवेल धडा; नड्डांचा निशाणा !

J. P. Nadda Attack Ashok Gehlot Government : "सर्वात वाईट गोष्ट म्हणजे राजस्थानमध्ये प्रशासनाचा पूर्ण अभाव आहे."
J. P. Nadda Attack Ashok Gehlot Government :
J. P. Nadda Attack Ashok Gehlot Government : Sarkarnama

New Delhi News : राजस्थानमधील प्रतापगडमध्ये एका महिलेच्या नग्न व्हिडिओवरून अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारवर निशाणा साधला आहे. नड्डा यांनी राजस्थानमधील प्रतापगडमध्ये मणिपूरसारखीच घटना घडली असून, एका महिलेच्या नग्न व्हिडिओवरून राज्यातील गेहलोत सरकारच्या कारभारावर टीका केली. राज्यातील जनता येत्या काळात राज्य सरकारला धडा शिकवेल, अशा शब्दांत नड्डा यांनी टीका केली आहे. (Latest Marathi News)

J. P. Nadda Attack Ashok Gehlot Government :
Rohit Pawar On NCP Crisis : राष्ट्रवादीत वाढतेय रोहित पवारांची 'पॉवर'; विरोधी नेत्यांसोबत भेटीगाठी, सुळेंनी केले 'राष्ट्रीय प्रमोशन' ?

जे. पी. नड्डा यांनी शनिवारी सकाळी ट्विट करत अशोक गेहलोत सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये नड्डा म्हणाले, "राजस्थानच्या प्रतापगडचा व्हिडिओ धक्कादायक आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे राजस्थानमध्ये प्रशासनाचा पूर्ण अभाव आहे. मुख्यमंत्री आणि मंत्री गटबाजी मिटवण्यात व्यस्त आहेत, बाकीच्यांकडून दिल्लीतील घराणेशाहीला खुश करण्यात वेळ घालवला जात आहे."

J. P. Nadda Attack Ashok Gehlot Government :
Uddhav Thackeray News : सरकार 'गॅसवर असल्यानेच सिलिंडरच्या किमती कमी केल्या ; ठाकरेंचा हल्लाबोल

"राज्यात महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, यात आश्चर्य नाही. महिलांवरील छेडछाडीच्या घटना दररोज समोर येतात. राजस्थानची जनता राज्य सरकारला धडा शिकवेल," असे नड्डा म्हणाले. विशेष म्हणजे, जे.पी. नड्डा शनिवारी राजस्थानमधील सवाई माधोपूरच्या दौऱ्यावर जात आहेत, जिथे ते दसरा मैदानावरून अशोक गेहलोत सरकारच्या विरोधात भाजपच्या राज्यव्यापी कार्यक्रम "परिवर्तन संकल्प यात्रा"ला सुरुवात करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com