Rohit Pawar On NCP Crisis : राष्ट्रवादीत वाढतेय रोहित पवारांची 'पॉवर'; विरोधी नेत्यांसोबत भेटीगाठी, सुळेंनी केले 'राष्ट्रीय प्रमोशन' ?

Rohit Pawar In Action Mode : "विरोधकांशी सुसंवादाचे कसब त्यांच्यात दिसून येते. "
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Mumbai News : काँग्रेससह बहुतांशी विरोधी पक्षांची मोट "इंडिया" आघाडीखाली बांधण्यात आली असून 31ऑगस्ट आणि आज 1 सप्टेंबरला मुंबईच्या ग्रँड हयात या पंचतारांकीत हॉटेलमध्ये बैठक पार पडत आहे. या बैठकीचे यजमानपद शिवसेना ठाकरे गटाने घेतले असले तरी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) पाहुण्यांच्या पाहुणचारात अजिबात मागे दिसत नाही. या निमित्ताने होणाऱ्या विविध राज्यातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे हिरीरीने पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे. (Latest Marathi News)

Supriya Sule
Rohit Pawar Meet Ajit Pawar : रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट; कर्जत MIDC बाबत सविस्तर चर्चा!

याबाबत स्वत आमदार रोहित पवार यांनीच ट्वीट केलेल्या फोटोत ते काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी भेटत असताना यातील फोटोत खासदार सुप्रिया सुळे या रोहित पवारांची ओळख करून देताना दिसत आहेत. त्या-त्या राज्यात सत्तेत असलेल्या या प्रमुख नेत्यांशी रोहित पवार आपुलकीने जवळीक साधत असल्याचेही स्पष्ट होत आहे.

रोहित पवार हे शरद पवारांचे नातू असून मोठ्या साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून, त्यांचा रोजचा दिनक्रम असतो. मतदातसंघांतील कामे, सहकारी पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी बरोबरच विरोधकांशी सुसंवादाचे कसब त्यांच्यात दिसून येते. त्याचबरोबर साहित्य, कला, संगीत, उद्योजक, शिक्षण क्षेत्रातील मातब्बर आदींसोबत त्यांचा वावर शरद पवारांच्या कार्यशैलीची आठवण करून देणारा असाच आहे.

Supriya Sule
NCP Crisis News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 'RRR' पक्षाला सुपरहीट करणार का? सभांचा लावणार धडाका..

या अनुषंगाने मुंबईत होत असलेल्या "इंडिया आघाडी"च्या बैठकी निमित्ताने रोहित यांनी राष्ट्रीय स्तरावर मोठे नाव असलेल्या प्रभावी नेत्यांच्या घेतलेल्या गाठीभेटी आणि यात खासदार सुप्रिया सुळेंनी घेतलेला पुढाकार आमदार रोहित पवार नजीकच्या काळात राष्ट्रीय राजकारणात झळकणार का? अशा शक्यतांच्या चर्चा सुरू झाल्याचे दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com