सलमान खान हाजिर हो..! न्यायालयाने सलमानला बजावले समन्स

Salman Khan| Crime news|Andheri court| सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी दिलासा मिळाला असताना आता पुन्हा त्याला अंधेरी न्यायालयाने समन्स बजावले आहेत.
Salman Khan latest news, Salman Khan News, Salman Khan crime news
Salman Khan latest news, Salman Khan News, Salman Khan crime news
Published on
Updated on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman khan) अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. काळवीट शिकार प्रकरणात दिलासा मिळाला असतानाच आता तो पुन्हा एका प्रकरणात अडकला आहे. 3 वर्षांपूर्वी पत्रकार अशोक पांडे यांना धमकावल्या प्रकरणी आणि धक्काबुक्की केल्या प्रकरणी अंधेरीच्या (Andheri) मेट्रोपॉलिटन कोर्टाने समन्स बजावत दोघांनाही ५ एप्रिलला न्यायालयात (Court) हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. (Salman Khan latest news)

- काय आहे प्रकरण

तीन वर्षांपूर्वी म्हणजे 24 एप्रिल 2019 रोजी पत्रकार अशोक पांडे यांनी पहाटेच्या सुमारास सलमानला सायकल चालवताना पाहिले. त्यानतंर पांडे यांनी सलमानच्या बॉडीगार्डची परवानगी घेत त्याचा व्हिडीओ बनवण्याची विनंती केली, बॉडीगार्डची परवानगी घेऊन त्याने सलमानचा व्हिडीओ बनवण्यास सुरवात केली.

Salman Khan latest news, Salman Khan News, Salman Khan crime news
सलमानवर भडकला अभिजित बिचकुले; सलमान स्वत:ला भाई समजतो पण...

आपण सलमानचा व्हिडीओ काढत असताना सलमानला राग आला आणि त्याने अंगरक्षकाला सांगत आपल्याला मारहाण करण्यास सांगितले. त्यानतंर सलमाननेही मारहाण करत आपला मोबाईल फोन हिसकावून घेतल्याचा आरोप पांडे यांनी केला आहे. त्यानंतर पांडे यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधत सलमान आणि त्याच्या बॉडीगार्ड विरुद्ध तक्रार दाखल केली.

दरम्यान, त्यानंतर आलेल्या "COVID-19 मुळे प्रकरण लांबले, घटना घडल्याच्या दिवसापासून मी त्याचा पाठपुरावा करत होतो आणि शेवटी न्यायालयाने माझ्या तक्रारीची दखल घेतली आणि अभिनेत्याविरुद्ध प्रक्रिया जारी केली याचा मला आनंद आहे," अशी प्रतिक्रीया पांडे यांनी दिली आहे. आता ५ एप्रिलला सलमान आणि त्याचा बॉडीगार्ड न्यायालयात हजर राहतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com