Venkateshwara Temple Stampede : व्येंकटेश मंदिरात चेंगराचेंगरी, 9 भाविकांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदतीचे आदेश

Andhra Pradesh Stampede : आंध्र प्रदेशाच्या काशीबुग्गा येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 9 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Scene outside Sri Venkateshwara Swamy Temple in Kasibugga, Andhra Pradesh, where a stampede claimed nine lives.
Scene outside Sri Venkateshwara Swamy Temple in Kasibugga, Andhra Pradesh, where a stampede claimed nine lives.sarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात आज (शनिवार) एकादशीच्या दिवशी भाविकांची चेंगराचेंगरी झाली. यामध्ये नऊ भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. तर, अनेक भक्त गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक मासमुळे मंदिरात मोठ्या संख्येने भाविक आले होते.या गर्दीवर स्थानिक प्रशासन आणि मंदिर प्रशासनाला नियंत्रण ठेवता आले नाही. भाविकांमध्ये अचनाक धक्काबुक्की सुरू झाली आणि चेंगराचेंगरी झाल्याचा अंदाज आहे.

या चेंगराचेंगरीत नऊ भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमी मंदिराच्या जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या घटनेनंतर ट्विट करत मृत्यू कुटंबीयांच्या परिवारासोबत सहवेदन व्यक्त केले आहे.

Scene outside Sri Venkateshwara Swamy Temple in Kasibugga, Andhra Pradesh, where a stampede claimed nine lives.
BJP setback: भाजपला धक्का! शिंदे, अजितदादांच्या मंत्र्यांचे सूर बदलले, विरोधकांच्या मतचोरीविरोधाला बळ मिळणार?

ते म्हणाले, या घटनंतर वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीची घटना ही दु:खद आहे. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मी स्थानिक अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना घटनेच्या ठिकाणी भेट देण्यास आणि मदत कार्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

Scene outside Sri Venkateshwara Swamy Temple in Kasibugga, Andhra Pradesh, where a stampede claimed nine lives.
Girish Mahajan : या वयात सुद्धा गिरीश महाजन काय धावले.. पाहून चाळीसगावचे सगळे तरुण थक्क!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com