A. K. Antony Reaction : ‘अनिलच्या निर्णयामुळे माझे मन दुखावले...’ : मुलाच्या भाजपप्रवेशावर काँग्रेस नेते ॲंटनींची पहिली प्रतिक्रिया

भारत देशाचा मुख्य आधार एकता आणि धार्मिक सलोखा आहे.
A. K. Antony-Anil Antony-
Piyush Goyal
A. K. Antony-Anil Antony- Piyush GoyalSarkarnama
Published on
Updated on

तिरुअनंतपुरम : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते ए. के. ॲंटनी (A. K. Antony) यांचे सुपुत्र अनिल ॲंटनी यांनी आज (ता. ६ एप्रिल) भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशावर राजकीय वर्तुळात उलटसुटल प्रतिक्रिया येत असताना अनिल यांचे पिताश्री ए. के. ॲंटनी यांचीही प्रतिक्रिया आली आहे. त्यात त्यांनी मुलाच्या निर्णयामुळे माझे मन दुखावले आहे, असे भावून होत सांगितले. (Anil's decision to join BJP hurt my heart...' : A. K. Antony)

A. K. Antony-Anil Antony-
Piyush Goyal
Sanjay Jagtap News : दिल्लीत महाराष्ट्राचा आमदार असल्याचे सांगायला लाज वाटते; लोक बॅगा पाहतात : जगतापांनी व्यक्त केली खंत

तिरुअनंतपुरम येथे पत्रकरांशी बोलताना माजी संरक्षण मंत्री ॲंटनी मुलाच्या भाजप प्रवेशावर भाष्य केले. ते म्हणाले की, अनिलच्या भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयाने माझे मन प्रचंड दुखावले आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. भारत देशाचा मुख्य आधार एकता आणि धार्मिक सलोखा आहे. सन २०१४ नंतर, मोदी सरकार सत्तेवर आले. तेव्हापासून ते (भाजप) पद्धतशीरपणे देशाची विविधता आणि धर्मनिरपेक्षता मूल्याला बाधा पोचवित आहेत.

भारतीय जनता पक्ष फक्त एकसमानतेवर विश्वास ठेवतो, ते देशाच्या संवैधानिक मूल्यांना नष्ट करत आहेत, असा आरोपही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अँटनी यांनी केला. दरम्यान, आपण नेहरु-गांधी परिवाराशी एकनिष्ठ राहणार असल्याचेही ॲंटनी यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.

A. K. Antony-Anil Antony-
Piyush Goyal
Bhavana Gawali Meet Amit Shah : प्रियांका चतुर्वेदीपाठोपाठ भावना गवळीही अमित शहांना भेटल्या अन्‌ म्हणाल्या, रोशनीला मारहाण झालीच नाही...

अनिल ॲंटनी यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या वेळी व्ही. मुरलीधरन आणि केरळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन उपस्थित होते. अनिल हे केरळ काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांचा निर्णय हे ए. के. ॲंटनी यांच्यासाठी धक्कादायक ठरल्याचे पुढे येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com