Bhavana Gawali Meet Amit Shah : प्रियांका चतुर्वेदीपाठोपाठ भावना गवळीही अमित शहांना भेटल्या अन्‌ म्हणाल्या, रोशनीला मारहाण झालीच नाही...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडेही दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रारी करण्यात येत आहेत.
Priyanka Chaturvedi, Bhavana Gawali ,Amit Shah
Priyanka Chaturvedi, Bhavana Gawali ,Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींच्या (Priyanka Chaturvedi) पाठोपाठ शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनीही आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाणप्रकरणी या दोन्ही भेटी झाल्या आहेत, त्यामुळे या भेटीच्या सिलसिल्यामागे नेमकं काय दडलंय, याची चर्चा महाराष्ट्रात होत आहे. (After Priyanka Chaturvedi, Bhavana Gawali also meet Amit Shah)

शिवसेनेची ठाण्यातील महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाकडून मारहाण झाली होती. त्यानंतर रोशनीला दवाखान्यात ॲडमीट करण्यात आलेले आहे. त्यावरून महाराष्ट्रात जोदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकीकडे रस्त्यावरील लढाई लढली जात असताना दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडेही दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रारी करण्यात येत आहेत.

Priyanka Chaturvedi, Bhavana Gawali ,Amit Shah
Mohol Politics : धनंजय महाडिक, उमेश पाटलांची घोषणा हवेत; मोहोळमध्ये ‘आरपी’ पॅटर्नचीच चलती!

ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी बुधवारी अमित शहा यांची भेट घेत गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी चतुर्वेदी यांनी शहांकडे केली आहे. त्यानंतर आज शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी शहा यांची भेट घेतली. मात्र, त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकला नाही. शहा हे भाजपच्या कार्यक्रमात व्यस्त होते. त्यामुळे त्यांची भेट हेाऊ शकली नाही. शहा यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं की, तुमचं निवेदन शहा यांच्यापर्यंत पोच करण्यात येईल.

भावना गवळी काय म्हणाल्या, रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाच्या निमित्ताने विरोधी पक्षातील काही लोक वातावरण तयार करण्याचे काम करत आहेत. रोशनी शिंदेंना कुठलीही मारहाण झालेली नाही. ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेले आहे. डॉक्टरांच्या अहवालात आलेले आहे. मात्र, ठाकरे गटाच्या खासदारांनी गृहमंत्री शहा यांना अत्यंत चुकीचे निवेदन दिलेले आहे. राज्य सरकारला बदनाम करायचं, बोंबा मारायच्या, हे यांचे उद्योग आहेत.

Priyanka Chaturvedi, Bhavana Gawali ,Amit Shah
Ashish Deshmukh : काँग्रेस पक्षाविरोधी कारवाईबाबत आशिष देशमुख म्हणाले, ‘साडेतीन तास चाललेल्या बैठकीत...’

ठाण्यात जायला ठाकरे यांना कुठलेच मार्ग नव्हते. मात्र, रोशनी शिंदे प्रकरणी त्यांनी चालवली, लावून धरलं आणि ते त्या ठिकाणी गेले. पोलिसांच्या अहवालातही महिलेला मारहाण झालेली नाही, असं नमूद करण्यात आलेले आहे. मी एक निवेदन गृहमंत्र्यांना दिलेले आहे, त्यात हे सर्व नमूद केलेले आहे. फक्त स्टंट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारला बदनाम करायचं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करायचं. एवढंच काम त्यांच्याकडे उरले आहे, असेही खासदार गवळी यांनी म्हटले आहे.

Priyanka Chaturvedi, Bhavana Gawali ,Amit Shah
Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले : ‘जनआरोग्य योजना मागे घ्या; अन्यथा...’

जे लोकं खोटं बोलतात. त्या लोकांचीच अगोदर चौकशी करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी मी निवेदनाद्वारे केलेली आहे. शीतल म्हात्रे प्रकरणात कोण होतं. त्याचा अहवाल का मागितला जात नाही. म्हात्रे यांच्या पाठीशी का कोण उभा राहिलं नाही. आता तुम्हाला महिला दिसते, शीतल म्हात्रे महिला नव्हती का. आता तुम्ही महिलांना पुढे करून राजकारण करता, असा सवालही गवळी यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com