Karnataka Election 2023: भाजपला दुसरा धक्का; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, काय आहे कारण?

Jagdish Shettar's entry into Congress: तीन दिवसांपुर्वीच कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये सामील झाले.
Jagdish Shettar
Jagdish Shettar Sarkarnama

Karnataka Elelction: कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला दुसरा मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये सामील झाले. याला काही तास उलटत नाहीत तर तिकीट नाकारल्यामुळे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. (Another blow to BJP; Former Chief Minister Jagdish Shettar's entry into Congress, what is the reason?)

Jagdish Shettar
Uddhav Thackeray News: हिंडेनबर्ग रिपोर्ट खोटा तर सत्यपाल मलिकांच्या प्रश्नांना उत्तरं का दिली नाही; ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, रविवारी (16 एप्रिल) त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. लिंगायत समाजातील जगदीश शेट्टर यांनी रविवारी रात्री काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. जगदीश शेट्टर यांनी रविवारी सांगितले की, त्यांना पक्षाच्या हायकमांडने राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर दिली होती, जी त्यांनी नाकारली. पुढील राजकीय वाटचालीची घोषणा करण्यापूर्वी बंगळुरूमधील पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांच्याकडे सभागृहातून राजीनामा सुपूर्द केल्यानंतर शेट्टर म्हणाले की, “मला फक्त हुबळी-धारवाड-मध्य विधानसभेची जागेवरुन निवडणूक लढवण्याची मागणी केली होती. राज्यात पक्षाच्या विकासात मी खूप योगदान दिले आहे. पण ज्याप्रकारे माझा अपमान झाला त्याने मला प्रचंड वेदना झाल्या. त्याला आव्हान द्यावे असे मला वाटले. त्यामुळेच मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

Jagdish Shettar
Maharashtra Bhushan Award : बारा श्रीसेवकांच्या मृत्युस अमित शाह हेच कारणीभूत ; लवकरच जायचं होतं म्हणून दुपारी..

शेट्टर यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा म्हणाले, "आम्ही त्यांना (जगदीश शेट्टर) कर्नाटकचे मुख्यमंत्री केले आणि आम्ही त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष केले." त्यांच्या विधानांनी आम्हालाही दु:ख झाले आहे. भाजपमुळेच जगदीश शेट्टर जनतेत प्रसिद्ध झाले. जगदीश शेट्टर यांना कर्नाटकची जनता कधीही माफ करणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com