Maharashtra Bhushan Award : बारा श्रीसेवकांच्या मृत्युस अमित शाह हेच कारणीभूत ; लवकरच जायचं होतं म्हणून दुपारी..

Maharashtra Bhushan Award 11 people died : सरकार आकडेवारी लपवत असल्याचा आरोप...
Amit Shah, Uddhav Thackeray
Amit Shah, Uddhav Thackeraysarkarnama

Maharashtra Bhushan Award 11 people died Uddhav Thackeray : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल (रविवारी) गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात सहभागी झालेल्या बारा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

‘या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, जे उपचार घेत आहेत, त्यांचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे’, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Amit Shah, Uddhav Thackeray
Atique Ahmad News : अतिकच्या आयुष्याची चित्तरकथा..; वडील टांगा चालवायचे, मुलाने १७ व्या वर्षी केला पहिला खून ; महागड्या मोटारी..

या ११ श्रीसेवकांच्या मृत्यूबाबत समाजाच्या विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे विरोधीपक्षनेता अजित पवार यांनी काल रात्री उष्माघातामुळे उपचार घेत असलेल्या श्रीसेवकांची रुग्णालयात भेट घेतली.

या घटनेला गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. "अमित शाह यांना लवकर निघायचं होतं म्हणून हा कार्यक्रम दुपारी घेण्यात आला. उष्माघातामुळे या १२ श्रीसेवकांचा मृत्यू झाला, " असे ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Amit Shah, Uddhav Thackeray
Karnataka Election 2023 : भाजपमधून गळती सुरुच ; येदियुरप्‍पांच्या नातवाचा JDS मध्ये प्रवेश ; बहीण भावावर नाराज...

अजित पवार यांनीही कार्यक्रमाच्या नियोजनावर टीका केली आहे. कार्यक्रमाच्या नियोजनात हलगर्जीपणा केला तर काय घडू शकते हे आपण या घटनेमुळे पाहिले. किती जणांना मृत्यू झाला याबाबत सरकार आकडेवारी लपवत असल्याचा आरोप पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

Maharashtra Bhushan Award :
Maharashtra Bhushan Award : Sarkarnama

मनाला वेदना देणारी घटना..

कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल १७ रुग्णांची मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी रात्री भेट घेतली. “महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील ज्या श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. त्यांची मी विचारपूस केली. या रुग्णांना योग्य उपचार देण्याची सूचना डॉक्टरांना केली आहे. ही दुर्देवी घटना आहे. मनाला वेदना देणारी घटना आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Amit Shah, Uddhav Thackeray
Karnataka Election JDS News : माजी पंतप्रधानांच्या सुनेचं तिकीट कापलं..; वहीनींना डावलून सामान्य कार्यकर्त्यांला..

फडणवीसांकडून मृतांना श्रद्धांजली

१२ श्रीसदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. प्रशासन संपूर्ण समन्वय ठेवून असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com