Bihar Anti Paper Leak Act : बिहारमध्ये 'पेपर लीक' विरोधी कायदा मंजूर ; दहा वर्षांच्या तुरुंगवासासह एक कोटीच्या दंडाचीही तरतूद!

Bihar Politics News : नुकत्याच झालेल्या NEET-UG पेपर लीक प्रकरणाने सर्वांनाच धक्का दिला आहे. या पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे दिल्ली, बिहारसह अनेक राज्यांशी जुडले गेले आहेत.
CM Nitish Kumar
CM Nitish Kumar Sarkarnama
Published on
Updated on

Bihar CM Nitishkumar Goverment : बिहारमध्ये NEET पेपर लीक प्रकरणांवर अंकुश लावण्यासाठी नितीशकुमार सरकारने कडक कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेत लोक परीक्षा अनुचित साधन निवारण विधेयक 2024 सभागृहात पास झाले आहे.

या विधेयकात प्रावधान केले गेले आहे की, पेपर लीक अथवा याच्याशी निगडीत कोणत्याही प्रकरणात सहभागी असणारे या कायद्यानुसार दोषी असतील आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. एवढच नाहीतर दोषींना दहा वर्षांची शिक्षा आणि तब्बल एक कोटी रुपयांचा दंडही ठोठवला जाणार आहे.

CM Nitish Kumar
Nirmala Sitharaman : महाराष्ट्राचा उल्लेख करत निर्मला सीतारामण संतापल्या; फडाफडा बोलून गेल्या...

या काद्यांतर्गत सर्व गुन्हे हे दखलपात्र आणि अजामिनपात्र असतील. बिहार(Bihar) लोक परीक्षा विधेयकाच्या प्रती संशोधनासाठी सोमवारी आमदारांमध्ये वितरीत करण्यात आल्या होत्या. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसवण्यासाठी केंद्र सरकारनेही कायदा बनवला आहे आणि राज्यांनाही हा पारीत करण्यासाठी पत्र पाठवले आहे. या विधेयकात स्पष्ट आहे की, कायद्यांतर्गत गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांना किमान तीन वर्षे शिक्षा होईल, जी पाच वर्षांपर्यंत असेल.

CM Nitish Kumar
Union Budget 2024 : विरोधकांचा हल्लाबोल; बजेटवर चर्चेआधीच सरकारला घेरलं

नुकत्याच झालेल्या NEET-UG पेपर लीक प्रकरणाने सर्वांनाच धक्का दिला आहे. या पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे दिल्ली, बिहारसह अनेक राज्यांशी जुडले गेले आहेत. या प्रकरणी बिहारमधील अनेकांना अटकही करण्यात आली आहे. मंत्री विजय कुमार चौधरी यांनी बिहार विधानसभेत हे विधेयक मांडले, ते मंजूर झाले. प्रस्ताव मांडताना ते म्हणाले की, साधारणपणे नावनोंदणी आणि सरकारी सेवांसाठी अशा परीक्षा घेतल्या जातात. अशा परिस्थितीत अनियमिततेच्या तक्रारी येत होत्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com