YS Sharmila Reddy: नजरकैदेच्या भीतीने मुख्यमंत्र्यांची बहीण वाय. एस. शर्मिला रेड्डींनी पक्ष कार्यालयात रात्र काढली!

APCC Chief YS Sharmila Reddy News :आमच्या आंदोलनाला सरकार घाबरले आहे, पण आमचा लढा सुरूच राहणार..
YS Sharmila
YS SharmilaSarkarnama
Published on
Updated on

आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वाय. एस. शर्मिला रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या जगमोहन रेड्डी सरकारच्या विरोधात आघाडी उघडली आहे. बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत त्यांनी विजयवाडा येथे 'चलो सचिवालय'आंदोलन पुकारले आहे. त्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जगमोहन रेड्डी सरकारकडून त्यांना नजरकैदेत ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाय. एस. शर्मिला रेड्डी यांनी गुरुवारची रात्र पक्ष कार्यालयातच काढली. 'चलो सचिवालय' आंदोलनापूर्वी नजरकैदेत आपल्याला ठेवू नये म्हणून विजयवाडा येथील काँग्रेस मुख्यालयात त्या रात्रभर राहिल्या.

सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. गेल्या पाच वर्षांत सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असून, त्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

YS Sharmila
Hingoli News: काँग्रेसचा दावा, पण हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेचाच डाव...

आमचे आंदोलन दडपण्यासाठी सरकार आम्हाला नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. महिला म्हणून पोलिसांपासून दूर राहून पक्ष कार्यालयात रात्र काढावी लागणे, हे लज्जास्पद आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

आम्ही दहशतवादी आहोत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमच्या आंदोलनाला सरकार घाबरले आहे, पण आमचा लढा सुरूच राहणार, असे ठामपणे त्यांनी माध्यमांना सांगितले. त्या मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या बहीण आहेत.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com