उपमुख्यमंत्र्यांना हरवणाऱ्या पल्लवी पटेल यांच्या नवऱ्यानेच आता सोडला पक्ष

उपमुख्यमंत्र्यांचा पराभव करून पल्लवी यादव ठरल्या होत्या जायंट किलर
Pallavi Patel
Pallavi Patel Sarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांना पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी धूळ चारली होती. यामुळे भाजपची अवस्था गड आला पण सिंह गेला, अशी झाली होती. याचवेळी पल्लवी या जायंट किलर ठरल्या होत्या. अपना दल कामेरावादी या पक्षाच्या नेत्या असलेल्या पल्लवी या त्यावेळी चर्चेत आल्या होत्या. आता त्यांचे पती पंकज पटेल हेच पक्ष सोडून गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) पल्लवी यादव यांच्या अपना दल कामेरावादी पक्षाने समाजवादी पक्षासोबत आघाडी केली होती. त्यांनी विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामगिरीमागे त्यांचे पती पंकज पटेल यांचा मोठा हात असल्याची चर्चा त्यावेळी होती. आता पंकज पटेल यांनी थेट पक्षाचा राजीनामा दिल्याने वाद चव्हाट्यावर आला आहे. पंकज हे आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. नंतर पल्लवी यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर ते अपना दलात सक्रिय झाले होते.

Pallavi Patel
केंद्रीय मंत्र्यासह उपमुख्यमंत्री अडचणीत! उच्च न्यायालयानं ओढले ताशेरे

अपना दल कामेरावादी पक्षाच्या प्रमुख कृष्णा पटेल आहेत. त्यांच्यासोबत कन्या पल्लवी या पक्षाची धुरा सांभाळत आहेत. पल्लवी यांचे पिता सोनेलाल पटेल यांच्या निधनानंतर अपना दल पक्षात फूट पडली होती. सोनेलाल यांच्यानंतर त्यांच्या पत्नी कृष्णा या पक्षाच्या अध्यक्षा बनल्या होत्या. त्यावेळी पल्लवी यांच्या भगिनी अनुप्रिया पटेल यांनी पक्षातून बाहेर पडून अपना दल (सोनेलाल) या पक्षाची स्थापन केली होती. अनुप्रिया पटेल या सध्या पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत.

Pallavi Patel
प्राजक्ता माळी तोंडघशी! सोशल मीडियावर पुन्हा झाली ट्रोल

विधानसभा निवडणुकीत सिराथू मतदारसंघात पल्लवी यांनी मौर्य यांचा पराभव केला होता. त्यावेळी पल्लवी यांच्या भगिनी केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनीही त्यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता. हे आव्हान पेलत पल्लवी जायंट किलर ठरल्याने उत्तर प्रदेशात चर्चेत आल्या होत्या. केशव प्रसाद मौर्य यांना ९८ हजार ७२७ मते मिळाली होती तर त्यांच्या प्रतिस्पर्धी पल्लवी पटेल यांना १ लाख ५ हजार ५६८ मते मिळाली होती. एकीकडे राज्यात भाजपने पुन्हा सत्ता मिळविली असताना मौर्य यांचा झालेला पराभव पक्षासाठी मोठा धक्का मानला जात होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com