
APP decides to contest Bihar elections alone : लोकसभा निवडणूक २०२४च्या आधी मोदी सरकारला तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी आणि केंद्रात सत्ता परिवर्तनासाठी निर्माण करण्यात आलेली विरोधी पक्षांची ‘I.N.D.I.A’आघाडी आता खिळखिळी झाल्याचे दिसत आहे. कारण, या आघाडातील पक्षामध्ये कुठेही एकजुट दिसत नाही, लोकसभा निवडणुकीनंतर ते अधिकच दिसून येत आहे. त्यामुळे मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची भाषा करणारी ही आघाडी आता स्वत: अखेरच्या घटका मोजत असल्याचे बोलले जात आहे.
या आघाडीतील एक महत्त्वाचा पक्ष असणारा आम आमद पार्टीने बिहारमध्ये या आघाडीला आणखी एक जोरदार धक्का देत, बिहार विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे याआधी दिल्ली विधानसभा निवडणुकीतही आप आणि काँग्रेस एकत्रित लढले नव्हते, परिणामी दिल्लीत भाजप सत्तेत आली. हा अनुभव गाठीशी असतानाही बिहारमध्ये पुन्हा एकदा तोच कित्ता गिरवला जात आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पार्टीने सर्व राज्यांची दोन भागात विभागनी केली आहे. पहिल्या भागात अशी राज्य आहेत, जिथे राष्ट्रीय नेतृत्वाकडून जास्त लक्ष दिले जाईल. या ठिकाणी निवडणूक प्रचारापासून ते अन्य सर्व महत्त्वाचे निर्णय अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया सारखे नेते घेतील. तर दुसऱ्या भागात स्थानिक नेतृत्वास निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय माध्यम संयोजक अनुराग ढांडा यांनी माहिती दिली की, आम आदमी पार्टी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही आघाडीत नसेल. पक्षाकडे स्वत:ची ताकद आहे आणि पक्ष त्याच विश्वासावर पुढे जात आहे. तर इंडिया आघाडीबद्ल बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ती आघाडी केवल लोकसभा निवडणुकीसाठीच केली गेली होती. आता आम आदमी पार्टी कोणत्याही आघाडीचा भाग नाही. सध्या आम आदमी पार्टी सर्व राज्यात आपले संघटन मजबूत करण्याचे काम करत आहे.
बिहारमध्ये आम आदमी पार्टी सात टप्प्यात यात्रा काढली जात आहे. अनुराग ढांडा यांनी म्हटले की, आम आदमी आपल्या बळावरच बिहार निवडणूक लढेल. आम्ही बुथस्तरावर पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर देत आहोत. लोकांशी जुडण्यासाठी सात टप्प्यात यात्रा काढली जात आहे. आम्ही सीमांचल क्षेत्रातून तिसऱ्या टप्प्यात पोहचलो आहोत. पक्ष बिहारच्या सर्व २४३ जागांवर निवडणूक लढणार आहे. असं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.