NCP Pune leadership : महापालिका रणसंग्रामासाठी पुण्यात राष्ट्रवादीचा 'डबल डाव' ; नवे नेतृत्व अन् नवी रणनीती!

NCP appoints new Pune city presidents ahead of municipal election: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे शहर कार्यकारिणीमध्ये मोठ्यास्तरावर फेरबदल करत नवी रचना केली आहे.
NCP Pune leadership :  महापालिका रणसंग्रामासाठी पुण्यात राष्ट्रवादीचा 'डबल डाव' ; नवे नेतृत्व अन् नवी रणनीती!
sarkarnama
Published on
Updated on

NCPs New Leadership Structure in Pune : आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे शहर कार्यकारिणीमध्ये मोठ्यास्तरावर फेरबदल करत नवी रचना केली आहे. पक्षातील सध्याच्या राजकीय घडामोडी, आगामी निवडणुकीतील आव्हाने आणि पक्षाचा बालेकिल्ला कायम राखण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून या नव्या कार्यकारिणीची रचना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महायुतीतील इतर पक्षांच्या पावलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादीने "डबल" शहराध्यक्ष पदाचा अनोखा प्रयोग करून वेगळा राजकीय संदेश दिला आहे.

शहराध्यक्षपदावर मोठा बदल-

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर मे महिन्यात गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे पक्षात पुढचा शहराध्यक्ष कोण याबाबत मोठी चर्चा रंगली होती. त्यातच १० जून रोजी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यस्तरीय वर्धापनदिन कार्यक्रम होणार असल्याने पक्षावर नवे नेतृत्व निश्चित करण्याची जबाबदारी आली होती. या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार पुणे शहरासाठी दोन स्वतंत्र शहराध्यक्षांची निवड करण्यात आली. ही घोषणा आमदार चेतन तुपे यांनी पत्रकार परिषदेत केली.

नवीन शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्षांची नावे -

पुणे शहर पूर्व विभागासाठी शहराध्यक्ष सुनील टिंगरे असणार आहेत तर कार्याध्यक्ष रूपाली ठोंबरे आणि हाजी फिरोज शेख असतील. पूर्व पुण्यात कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर, वडगाव शेरी हे चार विधानसभा मतदारसंघ येतात. या भागातील संघटन कौशल्य, महिला सहभाग आणि मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे.

पुणे शहर पश्चिम विभागासाठी शहराध्यक्ष सुभाष जगताप असतील तर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख आणि अक्रूर कुदळे असणार आहेत.या विभागात पर्वती, खडकवासला, कोथरूड आणि शिवाजीनगर हे प्रमुख विधानसभा क्षेत्र येतात. सुभाष जगताप यांचा संघटनातील अनुभव, देशमुख यांचे तरुण कार्यकर्त्यांशी असलेला सुसंवाद आणि कुदळे यांचे स्थानिक पातळीवरील कार्य यामुळे पश्चिम पुण्यात पक्षाचे बळ वाढण्याची शक्यता आहे.

NCP Pune leadership :  महापालिका रणसंग्रामासाठी पुण्यात राष्ट्रवादीचा 'डबल डाव' ; नवे नेतृत्व अन् नवी रणनीती!
NCP Pune: अजितदादांचा मास्टर स्ट्रोक; पुण्याची जबाबदारी सुनील टिंगरे अन् सुभाष जगताप यांच्यावर

नव्या नेतृत्वासमोर महत्त्वाची आव्हाने -

महापालिकेवर विजय : पुण्यात अजित पवार यांचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पक्षाला महापालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणावे लागणार आहेत.

योग्य प्रभाग रचना: - नव्या प्रभाग रचनेचा फायदा घेत पक्षबांधणी करणे ही मोठी जबाबदारी नवनियुक्त शहराध्यक्षांवर असणार आहे.

महायुतीतील समन्वय: सत्ताधारी महायुतीत असताना, इतर घटक पक्षांबरोबर समन्वय राखणे हे महत्त्वाचे ठरेल.

नव्या पक्षातील मतभेदांची नजाकत: शरद पवार गट व अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना योग्य पद्धतीने सामोरे जाण्याचे आव्हानही या नेतृत्वापुढे असेल.

महिला आणि अल्पसंख्याक नेतृत्वाला प्राधान्य -

रूपाली ठोंबरे यांची कार्याध्यक्षपदी निवड ही पुण्यात राष्ट्रवादीत महिला नेतृत्वाच्या चाचपणीसाठी नवी दिशा ठरू शकते. त्यांच्या आक्रमक कार्यशैलीचा पक्षाला फायदा होईल, असा पक्षनेतृत्वाचा विश्वास आहे. तसेच हाजी फिरोज शेख यांच्या निवडीमुळे अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधित्वही वाढवण्यात आले आहे.

NCP Pune leadership :  महापालिका रणसंग्रामासाठी पुण्यात राष्ट्रवादीचा 'डबल डाव' ; नवे नेतृत्व अन् नवी रणनीती!
Ajit Pawar On Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचे वक्तव्य मला महागात पडतं, अजितदादांनी दिली कबुली

पक्षाची प्रतिमा आणि विश्वास पुनर्स्थापित करण्याचे मोठे आव्हान -

अलीकडील काळात पक्षाच्या काही नेत्यांच्या नावावरून निर्माण झालेल्या वादग्रस्त प्रकरणांमुळे पक्षाला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरण, परदेशी महिलेच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटकेत गेलेला अल्पसंख्याक विभागाचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडे, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणुकीच्या आरोपाखाली माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर दाखल झालेला गुन्हा, तसेच राज्यभर गाजलेले वैष्णवी हगवणे प्रकरण आणि महिला आयोगावर झालेले आरोप – या सर्व घटनांनी पक्षाची प्रतिमा धुसर केली होती.

या पार्श्वभूमीवर पक्षाचे नव्याने निवडले गेलेले शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्षांवर पक्षाची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. कार्यकर्त्यांमध्ये नव्याने विश्वास निर्माण करणे, पक्षाचा विस्तार व्यापक स्तरावर करणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फुले-शाहू-आंबेडकरी विचार पुढे नेणे – ही त्यांच्या कामकाजाची मुख्य उद्दिष्टे असणार आहेत. या सगळ्या आव्हानांना तोंड देत, आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची नौका यशस्वीपणे पार करण्यासाठी नव्या नेतृत्वाला सक्रिय भूमिका बजवावी लागणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com