Supreme Court Judge: सर्वोच्च न्यायालयात दोन नव्या न्यायाधिशांची नियुक्ती; सीजेआय' चंद्रचूड यांनी दिली शपथ

Supreme Court Judge Prashant Mishra and K.V. Vishwanathan : सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती के.एम जोसेफ यांनी ही शिफारस केंद्राकडे पाठवली होती.
Supreme Court Judge  Prashant Mishra and K.V. Vishwanathan :
Supreme Court Judge Prashant Mishra and K.V. Vishwanathan : Sarkarnama

Supreme Court Judge: भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन नवीन न्यायाधीशांना आज (१९ मे) पदाची शपथ दिली. यात आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा आणि अधिवक्ता के.व्ही.विश्वनाथन यांचा समावेश आहे.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा 34 न्यायाधीशांचा कोरम पूर्ण झाला आहे. (Appointment of two new judges in the Supreme Court; CJI' Chandrachud administered the oath)

Supreme Court Judge  Prashant Mishra and K.V. Vishwanathan :
Sushma Andhare News : ''...यांच्यापासून माझ्या जीवाला धोका!''; बीडमधील घटनेनंतर अंधारेंचा खळबळजनक दावा

ऑगस्ट 2030 मध्ये, के.व्ही. विश्वनाथन भारताचे सरन्यायाधीश (CJI) होतील. विश्वनाथन हे 24 मे 2031 पर्यंत म्हणजेच 9 महिन्यांहून अधिक काळ देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे नेतृत्व करतील. कॉलेजियमने दोघांनाही SC न्यायाधीश बनवण्याची शिफारस केली होती.16 मे रोजी, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता केव्ही विश्वनाथन आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाच्या नियुक्ती म्हणून बढतीसाठी केंद्राकडे शिफारस केली. (Supreme Court news)

सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI Dhananjay Chandrachud) यांनी, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती के.एम जोसेफ यांनी ही शिफारस केंद्राकडे पाठवली होती.सर्वोच्च न्यायालयात 34 न्यायाधीश असायला हवेत, पण आता फक्त 32 न्यायाधीश आहेत.काही न्यायाधीशांच्या निवृत्तीनंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ २८ न्यायाधीश उरणार आहेत. या कारणास्तव आधी या दोन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली.

Supreme Court Judge  Prashant Mishra and K.V. Vishwanathan :
BJP Mission 2024 : कर्नाटकातील पराभवानंतर भाजपची आजपासून नवी योजना ; प्रत्येक लोकसभा मतदारसंघात..

४८ तासांत केंद्राकडून शिफारस मंजूर

केंद्र सरकारने कॉलेजियमच्या शिफारशीला ४८ तासांत मान्यता दिल्यानंतर लगेचच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही दोन्ही न्यायाधीशांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. (Supreme Court news Latest update)

सर्वोच्च न्यायालयाचे चौथे ज्येष्ठ न्यायमूर्ती एम.आर. शाह सोमवारी निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक निकाल देणाऱ्या न्यायाधीशांपैकी शाह हे एक आहेत. सुमारे चार वर्षांत त्यांनी ७१२ निवाडे दिले. त्यांचा त्या घटनापीठात नुकताच समावेश करण्यात आला होता.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com