BJP Mission 2024 : कर्नाटकातील पराभवानंतर भाजपची आजपासून नवी योजना; प्रत्येक लोकसभा मतदारसंघात..

BJP Kamal Mitra Program to be Start : विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 'कमल मित्र'काम करणार आहेत.
j. p. nadda
j. p. nadda Sarkarnama

BJP Kamal Mitra Program to be Start : कर्नाटक निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर भाजपने आपलं लक्ष आता आगामी लोकसभा निवडणुकीकडे वळवलं आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यास भाजपनं सुरवात केली आहे. (mission 2024 bjp kamal mitra program to be start national president jp nadda inaugurate)

प्रत्येक लोकसभा मतदार संघातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने 'कमल मित्र'योजना तयार केली आहे. या योजनेचे उद्धघाटन आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते होणार आहे. (Political Short Videos)

j. p. nadda
Imran Khan News : इम्रान खान यांच्या घराबाहेर पोलिसांचा घेराव ; लष्कराने दिले हे दोन पर्याय

प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोनशे महिला या 'कमल मित्र'म्हणून कार्यरत होणार आहेत. य महिला पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणार आहेत. मोदी सरकारच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 'कमल मित्र'काम करणार आहेत.

मोदी सरकारच्य उज्ज्वला योजना, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मातृत्व वंदना योजना आदी पंधरा योजनांची माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे.

j. p. nadda
Jayant Patil : "नार्वेकर आमचे जावई.. ते तसं करणार नाहीत ' ; जयंत पाटील असं का म्हणाले..

या 'कमल मित्र' योजनेसाठी हिंदी-इंग्रजीसह तामिळ, तेलगु, मल्लायम, कन्नड, बंगाली, आसामी, गुजराती, मराठी भाषांमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. दिल्ली मध्ये आज (शुक्रवारी) जे.पी.नड्डा यांच्या हस्ते या योजना प्रारंभ होत आहे. (Political Breaking News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. या योजना सर्वसामान्यांसाठी फलदायी ठरल्या आहेत. मोदी सरकारने केलेली ही कामे सर्वसमान्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी पुण्यात कार्यकर्त्यांना केले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com