Manoj Pande: रिटायरमेंटच्या दिवशी मनोज पांडे यांना 'गार्ड ऑफ ऑनर'; उपेंद्र द्विवेदी नवे लष्कर प्रमुख

Army New Chief Upendra Dwivedi: नवे लष्कर प्रमुख द्विवेदी यांना सेवाज्येष्ठतेनुसार ही निवृत्ती करण्यात आली आहे. नवीन तंत्रज्ञान लष्करात राबवण्यात द्विवेदीचे मोठे योगदान आहे.
Manoj Pande, Upendra Dwivedi
Manoj Pande, Upendra DwivediSarkarnama
Published on
Updated on

लष्कर प्रमुख मनोज पांडे (Manoj Pande)आज सेवानिवृत्त होत आहेत. शेवटच्या दिवशी त्यांना लष्कराचा मानाचा असलेला सन्मान 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. त्यांच्या जागी लेफ्टनट जनरल उपेंद्र द्विवेदी हे पदभार सांभाळणार आहेत.

द्विवेदी (Upendra Dwivedi) हे 30 वे लष्कर प्रमुख आहेत. 19 फेब्रुवारी रोजी त्यांनी व्हाईस आर्मी चीफ ऑफ स्टाफपदी नेमणूक करण्यात आली होती. ११ जून रोजी त्यांची लष्कर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

सरकारने गेल्या महिन्यात पांडे यांचा एक महिन्याचा कार्यकाळ वाढवला होता. पांडे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. पण सहा दिवस अगोदर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. लष्कर प्रमुख पदाला मुदतवाढ देण्याची ही पहिलीच घटना आहे.

३० एप्रिल २०२२ मध्ये जनरल पांडे यांनी लष्करप्रमुख पदाचा कार्यभार जनरल एम. एम. नरवणे यांच्याकडून स्वीकारला होता. तत्पूर्वी, पांडे हे लष्कर उपप्रमुखपदावर कार्यरत होते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) शिक्षण घेतलेले पांडे यांनी १९८२ मध्ये कार्पस‌् ऑफ इंजिनिअर्समधून (द बॉम्बे सॅपर्स) आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली.

Manoj Pande, Upendra Dwivedi
Judge Rahul Rokde: सत्ताधारी, आमदार अन् मंत्र्यांविरोधातील खटले अंतिम टप्प्यात असताना न्यायाधीशांची बदली

नवे लष्कर प्रमुख द्विवेदी यांना सेवाज्येष्ठतेनुसार ही निवृत्ती करण्यात आली आहे. नवीन तंत्रज्ञान लष्करात राबवण्यात द्विवेदीचे मोठे योगदान आहे. डेटा अॅनालिटिक्स, एआय या माध्यमातून द्विवेदी यांनी लष्करातील तंत्रज्ञानात मोठे बदल केले आहेत.

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे लष्कर उपप्रमुख आहेत. पांडे यांच्यानंतर ते दुसऱ्या क्रमांकाचे लष्करी अधिकारी आहेत. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांना चीन व पाकिस्तान सीमेवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com