अरविंद केजरीवाल यांना सुखदेव, राजगुरूंचा विसर

देशभरात हुतात्मा दिना निमित्त भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात येत आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalsarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली - देशभरात हुतात्मा दिना निमित्त भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात येत आहे. दिल्ली सरकारने हुतात्मा दिनानिमित्त आज वृत्तपत्रांत दिलेल्या जाहिरातीत केवळ भगतसिंग यांचेच छायाचित्र छापले. मात्र त्यांच्याबरोबरच फाशी गेलेले सुखदेव व राजगुरू या क्रांतिकारकांचा विसर दिल्ली सरकारला पडला. दिल्ली सरकारकडून ही चूक झाली, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी मान्य केले. ( Arvind Kejriwal forgets Sukhdev, Rajguru )

भाजपचे रामवीरसिंह बिधूडी यांनी हा मुद्दा समोर आणला. हुतात्मा दिनानिमित्त झालेल्या चर्चेत ते म्हणाले, की भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्व हुतात्म्यांचे, क्रांतिकारकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे दिल्ली सरकारच्या जाहिरातीत सुखदेव व राजगुरू यांची छायाचित्रे व उल्लेख नसणे ही गंभीर बाब आहे. असा भेदभाव योग्य नाही असे त्यांनी म्हटले व हुतात्म्यांची ‘वाटणी‘ करू नका, असेही आवाहन केले.

Arvind Kejriwal
Video: सो जाओ बच्चो वरना केजरीवाल आ जायेगा !';अरविंद केजरीवालांची डायलॉगबाजी

केजरीवाल यांनी ही चूक झाल्याचे मान्य केले. ते म्हणाले हुतात्मा दिनानिमित्त दिलेल्या जाहिरातींत एक चूक झाली. ती मी मान्य करतो. यापुढे अशी चूक होणार नाही यासाठी राज्य सरकार काळजी घेईल. याची पुनरावृत्ती होणार नाही, असे आश्वासन मी दिल्लीकरांना देतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com