Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या दाव्याने दिल्लीत भाजपचा ठोका चुकणार?

Delhi Assembly Election 2025 : दिल्लीच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. यातच आता केजरीवाल यांनी भाजप विरोधात एक नवीन दावा केला आहे.
Arvind Kejriwal AAP
Arvind Kejriwal AAPSarkarnama
Published on
Updated on

Arvind Kejriwal Delhi Elections : दिल्लीतील विधानसभा निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय घडामोंडीना वेग आलाय. गेली दोन टर्म अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची सत्ता आहे. आता सत्तेच्या हॅटट्रिकच्या तयारीत अरविंद केजरीवाल आहेत. निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहे. निवडणुका जशा-जशा जवळ येत आहेत, तशा-तशा आम आदमी पार्टीकडून भाजपवर हल्लाबोल होत आहे.

दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा असून अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. पण आधीच पक्षाने सर्व उमेदवार जाहीर केल्या आहेत. निवडणुकीच्या गदारोळात दिल्लीच्या उपराज्यपालांनी आप सरकारच्या महिला सन्मान योजनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, त्यानंतर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

Arvind Kejriwal AAP
Nitesh Rane : नितेश राणे यांचे पुन्हा आक्षेपार्ह वक्तव्य; म्हणाले, 'केरळ हा मिनी पाकिस्तान

केजरीवालांचा भाजपबद्दल धक्कादायक दावा

महिला सन्मान आणि संजीवनी योजनांवर भाजप नाराज झाल्याचा आरोप करत केजरीवाल यांनी 'दिल्लीत भाजपला 3 - 4 जागाही मिळणार नाहीत, असा दावा केला आहे. आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांच्यावर महिला सन्मान योजनेबाबत फसवणूक केल्याचा आरोप भाजप करत आहे. याबाबत दिल्ली भाजपच्या (BJP) महिला मोर्चाच्या नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या निवास स्थानाजवळ निदर्शने केली होती.

गेल्या दोन निवडणुकांमध्ये 'आप'चा एकतर्फी विजय

दिल्ली सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात 1,000 रुपये मासिक देयकासह मुख्यमंत्री महिला सन्मान योजना जाहीर केली होती. दिल्लीत 'आप'ची सत्ता राहिल्यास ही रक्कम 2,100 रुपये केली जाईल, असे केजरीवाल म्हणाले होते. 2020 मध्ये दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 62 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला केवळ 8 जागा मिळाल्या होत्या.

Arvind Kejriwal AAP
Kolhapur Police News : कोल्हापूर पोलिस ॲक्शन मोडवर! तळीरामांना बसणार चाप!

2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीतील 70 जागांपैकी 67 जागांवर आणि 2020 मध्ये 62 जागांवर विजय मिळवत केजरीवालांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. दिल्लीचे तक्त जवळपास एक दशक राखणार्‍या आम आदमी पक्षासाठी यंदाची विधानसभा निवडणूक मात्र अग्निपरीक्षा ठरण्याची शक्यता दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com