Nitesh Rane : नितेश राणे यांचे पुन्हा आक्षेपार्ह वक्तव्य; म्हणाले, 'केरळ हा मिनी पाकिस्तान

Nitesh Rane on Rahul Gandhi : कणकवली विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक करणारे नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. 'केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Pune News: कणकवली विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक करणारे नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. 'केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तेथे विजयी होतात, असे लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात, असं आक्षेपार्ह विधान नितेश राणे यांनी केलंय.

राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तेथून निवडून येतात. केरळचे सगळेच अतिरेकीच त्यांना मतदान करत आहेत. मी खरं बोलतोय. अतिरेक्यांना हाताशी धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत, असे अक्षेपार्ह विधान यावेळी नितेश राणे यांनी केले आहे.

पुण्यातील सासवड येथे शिवप्रताप दिन अफजलखानाचा वधाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नितेश राणे उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे विधान केले आहे.

Nitesh Rane
Dhananjay Munde : 'धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी काही भूमिका घेईल ती आम्हाला...',NCP च्या 'या' नेत्याचे मोठे संकेत

"आपल्या एका भगिनीला घरी आणण्यासाठी किती मेहनत करावी लागते ते आमच्यासारख्या हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांना विचारा. पण या केरळमधल्या भावाने 12 हजार हिंदू भगिनींचं आयुष्य वाचवलं. केरळसारख्या राज्यात त्यांनी हे काम करून दाखवले,” असे नितेश राणे आपल्या भाषणादरम्यान म्हणाले.

याआधीही केले आहे वादग्रस्त वक्तव्य

2 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसारमाध्यमांनी त्यांना मुस्लिमांबाबत काय समस्या आहे असे विचारले होते, तेव्हा ते म्हणाले की, देशात 90 टक्के हिंदू राहतात. हिंदूंच्या हिताची काळजी घेणे हा गुन्हा होऊ शकत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com