Arvind Kejriwal to Surrender : केजरीवालांना गंभीर आजार? आई-वडिलांची काळजी घेण्याचे केले आवाहन...

Delhi Liquor Scam Case CM Arvind kejriwal will go back to Tihar Jail : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन जूनला पुन्हा तिहार जेलमध्ये जावे लागणार आहे.
Arvind Kejriwal with Family
Arvind Kejriwal with FamilySarkarnama

Delhi Politics : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अंतरिम जामीनाची मुदत एक जूनला संपत आहे. त्यामुळे त्यांना दोन जूनला तिहार जेलमध्ये सरेंडर करावे लागणार आहे. त्याआधी त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिल्लीकरांशी संवाद साधला आहे. आपल्याला गंभीर आजार असू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.

केजरीवालांनी व्हिडिओतून आपल्या आई-वडिलांची काळजी घेण्याचे, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन दिल्लीकरांना केले आहे. सुप्रीम कोर्टाने मला निवडणूक प्रचारासाठी 21 दिवस दिले होते. परवा मी पुन्हा तिहार जेलमध्ये जाणार आहे. जेलमध्ये हे लोक मला किती दिवस ठेवणार माहिती नाही, असेही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

हुकूमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी मी जेलमध्ये जात असल्याचा मला अभिमान आहे. त्यांनी मला विविधप्रकारे तोडण्याचा, खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळाले नाही. मी जेलमध्ये असताना खूप त्रास दिला. माझे उपचार थांबवले, असा आरोप केजरीवालांनी केला आहे.

Arvind Kejriwal with Family
Black Magic in Karnataka : 21 शेळ्या, 3 म्हशी, 21 काळ्या मेंढ्या आणि 5 डुकरांचा बळी! काँग्रेस सरकार पाडण्यासाठी ‘ब्लॅक मॅजिक’

जेलमधून बाहेर आल्यानंतर वजन वाढत नसल्याचे सांगत केजरीवाल म्हणाले, हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यासाठी खूप चाचण्या करायच्या आहेत. पण मी उद्या तीन वाजता घरातून सरेंडर होण्यासाठी निघणार आहे. यावेळीही ते मला खूप त्रास देतील, पण मी झुकणार नाही.

मी जेलमध्ये असो की बाहेर, दिल्लीसाठी काम करणे थांबवणार नाही. मोफत वीज, मोहल्ला क्लिनीक, रुग्णालये, मोफत औषधे, उपचार, 24 तास वीज आणि अशा अनेक गोष्टी सुरू राहतील. मी परत आल्यानंतर प्रत्येक माता-भगिनीला दरमहा एक हजार रुपये देणे सुरू करेन, असे आश्वासन केजरीवालांनी दिले.

व्हिडिओदरम्यान केजरीवाल भावनिक झाल्याचे दिसले. आज मी माझ्या कुटुंबासाठी काहीतरी मागत आहे. माझे आई-वडील वृध्द आहेत. माझी आई खूप आजारी आहे. मी जेलमध्ये जाणार असल्याने तिची खूप काळजी वाटते. माझ्यानंतर आई-वडिलांची काळजी घ्या, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशी भावनिक साद केजरीवालांनी घातली.

Arvind Kejriwal with Family
Donald Trump Convicted : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी दोषी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com