Maharashtra Political News : देशाच्या संसदेत नीट आणि नेट पेपर फुटीचे प्रकरणाने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. राज्यातील पेपरफुटीचाही फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे. हे लोन स्पर्धा परिक्षांसह शैक्षणिक विभागात पसरल्याची शंका उपस्थित करून ठाकरे गटाचे नेते, भास्कर जाधवांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न विचारले. त्याला सडेतोड उत्तरे देत फडणवीसांनीही गु्न्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. पेपरफुटीमुळे विधानसभेत आज चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.
राज्यात वारंवार पेपरफुटीच्या घटना झाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तर त्या पद्धतीची खोटी माहिती पसरवण्याचे काम विरोधकांसह काहीजण करत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांकडून केला जात आहे. यावरून आज विधानसभेत फडणवीस, अशिष शेलार आणि भास्कर जाधव Bhaskar Jadhav आमने-सामने ठाकले होते. राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने अधिकारी गट ब आणि अराजपत्रित पदाच्या भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला.
याबाबत भास्कर जाधवांनी राजस्थानमधील परीक्षांतील घोटाळ्याकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले, राजस्थानमध्ये दहावी, बारावीतील परीक्षांतही गैरव्यवहार होतात. खासगी क्लासच्या वतीने उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना पुरवतात. त्यामुळे नापास होणारे विद्यार्थी पास होतात. तेच विद्यार्थी पुन्हा स्पर्धा परीक्षेला बसतात. तेथेतही पेपरफुटीमुळे ते पास होतात. तो प्रकार महाराष्ट्रात घडत तर नाही ना? अशी शंका उपस्थित करत जाधवांनी या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी.
राज्यात पेपर फुटीच्या खोट्या बातम्या पेरुन तसे नरेटिव्ह सेट करण्याचे काम विरोधक करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्यावर जाधव यांनी राज्यात झालेल्या अनेक पेपरफुटीची उदाहरणे दिली. 2018 ला महापरिक्षा पोर्टलचे अपयश, 2022 मध्ये मुंबई पोलिस पेपर, 2023 तलाठी परीक्षा, महानिर्मिती परीक्षा, वनविभाग परीक्षा, तसेच त्याच वर्षी 2023 झालेली मृद आणि जलसंधारण परीक्षा झाली.
या प्रत्येक वेळी पेपर फुटले. त्यावेळी सरकार कुणाचे होते? आता मात्र सराकर कोणाचेही असू द्या. पण हा रोग दूर करण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली. यातून राज्याची सुटका करण्यासाठी तुम्ही जे काही कराल त्यासाठी आम्ही सहाय्य करू, असे आश्वासनही जाधवांनी फडणवीसांना दिले.
जाधवांनी केलेल्या प्रत्येक प्रश्नांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी Devendra Fadnavis थेट उत्तरे दिली. फडणवीस म्हणाले, अभिमन्यू पवारांच्या शिष्टमंडळाला या अधिवेशनात हा कायदा आणू, असे आश्वासन दिले आहे. मात्र पेपरफुटीबाबत पुण्यातील एका संस्थेने खोटे नरेटिव्ह पसरवणे सुरू केले आहे. त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. भास्कर जाधव यांनी जे काही सांगितले ते सर्व व्हॉट्सअप मेसेज आहे. आता अशी खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असा इशाराही फडणवीसांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.