Rahul Gandhi in Lok Sabha : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. आजच्या संसदेतील सर्व घडामोडीत राहुल गांधी यांच्या पेहरावाने अनेकांचं लक्ष वेधलं.
याआधी संसदेत 'टी शर्ट'मध्ये येणारे राहुल गांधी (Rahul Gandhi) आज अचानक कुर्ता घालून आल्याचं पाहायला मिळालं. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड होताच त्यांच्या कपड्यांमधील बदलही अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला.
यंदाची म्हणजेच 18 वी लोकसभा वादळी ठरणार याची चुणूक लोकसभा अध्यक्षांच्या निवडीपासूनच दिसत आहे. शिवाय भाजपला पूर्ण बहुमत नसल्यामुळे त्यांना 'एनडीए'तील मित्र पक्षांच्या साथीने हे सरकार चालवायचं आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीला (India Alliance) मिळालेल्या भक्कम संख्याबळामुळे ते एक सक्षम विरोधक बनले आहेत. त्यामुळे आता सरकारला कोंडीत पकडण्यासाठी इंडिया आघाडीकडून सर्व प्रयत्न केले जातील यात शंका नाही.
अशातच आज संसदेतील चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं. कारण एरवी कोणालाही गरेजपेक्षा जास्त महत्व न देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींना चक्क ‘शेक हँड' केलं. शिवाय ते दोघेही नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यांच्या आसनापर्यंत घेऊन गेले.
त्यामुळे आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं संसदेतील वजन काय असणार आहे, याचा अंदाज आतापासून आल्याचं बोललं जात आहे. यावेळी राहुल यांच्यातील बदलही नजरेत येणारा होता. राहुल यांनी आज कुर्ता घातला होता. त्यामुळे त्यांनी संसदेचं विरोधी पक्षनेतेपदाला शोभेल असाच पेहराव केल्याचं दिसून आलं. तर पद येताच कपडे बदलले असही आता अनेकजण म्हणत आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचं दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, "लोकसभा हे सभागृह देशातील जनतेचा आवाज मांडणार आहे. लोकसभा अध्यक्ष या आवाजाचे रक्षणकर्ते आहेत. यावेळी विरोधी पक्षांचं बळ वाढलं आहे. आम्ही विश्वासाच्या तत्त्वावर सहकार्य करु. तुम्ही आम्हाला जनतेचा आवाज मांडण्याची संधी द्याल, अशी आशा आहे." तसंच या निवडणुकीत जनतेनं विरोधी पक्षांवर संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी दिली असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.