Owaisi on Pakistan : आता ओवेसींनीही केली पाकिस्तानची पोलखोल; जाणून घ्या, नेमकं काय म्हटलं आहे?

AIMIM chief Owaisi exposes Pakistan : ओवेसींनी पाकिस्तानी सैन्याच्या ऑपरेशन 'बुनयान-उल-मरसूर'वर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Asaduddin Owaisi Slams Pakistan
Asaduddin Owaisi Slams Pakistansarkarnama
Published on
Updated on

AIMIM Chief Asaduddin Owaisi Slams Pakistan : भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तान सैन्याकडून कुराण मधील आयतचा कथितरित्या दुरुपयोग केला गेल्याचा आरोप केला आहे. याशिवाय ओवेसींनी पाकिस्तानी सैन्याच्या ऑपरेशन बुनयान-उल-मरसूर वर प्रश्न उपस्थित करत, याला धार्मिक प्रतीकांचा राजकीय वापर असे संबोधले आहे.

ओवेसींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, पाकिस्तानी फार मोठे खोटारडे आहेत. 'बुनयान-अल-मरसूस'चा चुकीचा अर्थ काढत आहेत. ही कुराणमधील ती आयत आहे, ज्यामध्ये अल्लाहने म्हटले आहे की, जर तुम्ही त्यावर प्रेम करत असाल तर भिंतीप्रमाणे उभा रहा. परंतु तीच आयत हेही सांगते की, तुम्ही अशा गोष्टी का बोलतात ज्या तुम्ही करत नाहीत.

Asaduddin Owaisi Slams Pakistan
India Pakistan Ceasefire : भारताने नरमाई घेतली, की पाकिस्तान गुडघ्यावर? ; जाणून घ्या, पडद्यामागे काय घडलं?

याशिवाय ओवेसींनी १९७१मधील बांगलादेश युद्धाचा संदर्भ देत, पाकिस्तानी सैन्याच्या हेतूवरही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विचारले की, जेव्हा पूर्व पाकिस्तानात बंगली मुस्लिमांवर गोळ्या चालवल्या जात होत्या, तेव्हा काय ते भिंतीसारखे उभा राहणं विसरले होते?

ओवेसींनी पाकिस्तनाच्या द्विराष्ट्र सिद्धांतावरही प्रहार केला. त्यांनी म्हटले की, भारतात आज २३ कोटींपेक्षा अधिक मुसलमान राहतात, आणि आम्ही जिन्नांचा द्विराष्ट्र सिध्दांत फेटाळला होता. आम्ही भारतीय आहोत, येथे राहू. पाकिस्तान वारंवार धर्माच्या नावावर आमच्यात फूट पाडू इच्छितो, परंतु आम्ही असं कधीही होवू देणार नाही.

Asaduddin Owaisi Slams Pakistan
India ultimatum Pakistan : मोठी बातमी! मोदी सरकारचा पाकिस्तानला ‘अल्टिमेटम’ ; 'आता कोणताही दहशतवादी हल्ला...'

याशिवाय ओवेसींनी पाकिस्तानवर अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेवर देखील बॉम्बफेक केल्याचा आरोप केला आणि म्हटले की, पाकिस्तानचे डीप स्टेट इस्लामचा एका मुखवट्याच्या रूपात वापरत करून, दहशतवादास प्रोत्साहन देत आहेत. हे ७५ वर्षांपासून भारताविरोधात कायम सुरू आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com