Asaduddin Owaisi On Gyanvapi : पुरातत्व विभाग हिंदुत्वाचे गुलाम झालंय; ज्ञानवापी प्रकरणावरून ओवैसींची आगपाखड!

Asaduddin Owaisi On Gyanvapi : "पुरातत्व विभागाने वैज्ञानिक तत्वाचे अवमुल्यन केले असून ते हिंदूत्वाचे गुलाम झाले..."
Asaduddin Owaisi On Gyanvapi
Asaduddin Owaisi On Gyanvapi Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर पूर्वी एक हिंदू मंदिर होते, या दाव्यावर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या वतीने अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार 17 व्या शतकामध्ये हिंदू मंदिर उद्धवस्त करून त्या ठिकाणी मशीद बांधण्यात आली असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यावरून आता राजकारण तापायला सुरुवात झाली असून एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवैसी यांनी पुरातत्व विभाग हा हिंदूत्वाचा गुलाम झाला असल्याची टीका केली आहे. (Asaduddin Owaisi On Gyanvapi)

Asaduddin Owaisi On Gyanvapi
'ज्ञानव्यापी ही कयामतपर्यंत मशिदच राहणार...' शिवलिंग सापडल्याच्या चर्चेनंतर ओवसींचा दावा

ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी हिंदू मंदिर अस्तित्वात होते असा दावा हिंदूत्वादी संघटनाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी वाराणसी न्यायालयात केस सुरू आहे. न्यायालायने पुरातत्व विभागाला या परिसराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्याचे अहवाल दोन्ही पक्षकारांना देण्याचाही निर्णय न्यायालयाने घेतला होता. त्यानंतर ओवैसी यांनी पुरातत्व विभागाचा अहवालाती नोंदी पाहून तो अहवाल फेटाळून लावला आहे. पुरातत्व विभागाने दिलेला हा अहवाल केवळ तर्कावर आधारित असून पुरातत्व विभागाने वैज्ञानिक तत्वाचे अवमुल्यन केले असून ते हिंदूत्वाचे गुलाम झाले असल्याचा घणाघात ओवैसींनी केला आहे.

औरंगजेबाच्या शासनकाळात मंदिर पाडले -

या प्रकरणात हिंदूत्ववाद्यांच्या बाजूने वकील विष्णू शंकर जैन हे न्यायायालयात बाजू मांडत आहे. जैन यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने प्राप्त झालेल्या अहवालातील माहिती दिली. जैन म्हणाले की, पुरातत्व विभागाने दिलेल्या 839 पानांच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिराच्या शेजारी असलेली मशीद ही 17 व्या शतकात औरंगजेबाच्या शासनकाळात बांधण्यात आली. त्यासाठी या ठिकाणी असलेले पूर्वीचे भव्य हिंदू मंदिर उद्धवस्त करण्यात आले आणि त्याच्या पायावरच ही मशीद बांधण्यात आली होती, असेही या अहवालात म्हटले असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.

Asaduddin Owaisi On Gyanvapi
AIMIM : ओवैसी यांच्या घरावर जोरदार दगडफेक ; चौथ्यांदा हल्ला

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मशिदीच्या भिंतीवर स्वास्तिक ब्रम्हकमळ -

पुरातत्त्व विभागाच्या या अहवालानुसार ज्ञानवापी मशिदीच्या तळघराचे सर्वेक्षण करत असताना पूर्वी या ठिकाणी हिंदू मंदिर असल्याचे ठोस पुरावे मिळाले असल्याचेही नमूद केले आहे. तसेच या सर्वेक्षणादरम्यान पुरातत्त्व विभागाला काही हिंदू मूर्तींचे अवशेषही आढळून आले आहेत. याखेरीज मशिदीचे बांधकाम करत असताना मंदिराचे काही खांब आणि काही भाग आहे तसाच मशिदीच्या बांधकामात वापरण्यात आला आहे, त्यामध्ये पश्चिमेकडील बाजूची जी भिंत आहे, ती मंदिराची मूळ भिंत आहे तशीच असून त्या भिंतीवर घंटा, स्वास्तिक चिन्ह आणि ब्रम्ह कमळ आढळून आले असल्याची नोंद या अहवालात केली असल्याची माहिती जैन यांनी दिली आहे.

तसेच जैन यांनी पुढे म्हटले की ,पुरातत्त्व विभागाच्या अहवालात नोंदवण्यात आलेल्या निरिक्षणानुसार ज्ञानवापी मशिदीच्या परिसरातील तळघराचे छत ज्या खांबावर स्थिर आहेत, ते सर्व खांब हे नागर शैलीतील मंदिराचे खांब आहेत. या सर्व बाबीवरून हेच स्पष्ट होते की, या ठिकाणी भव्य मोठे हिंदू मंदिर अस्तित्वात होते, आणि औरंगजेबाच्या शासनकाळात ते उद्धवस्त करून या ठिकाणी मशीद बांधण्यात आली असेही जैन यांनी म्हटले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com