Ayodhya Ram Temple Ceremony : अयोध्येत निर्माण होत असलेल्या भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी पुन्हा एकदा एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींचं एक वक्तव्य समोर आलं आहे. ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ओवैसींनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, '6 डिसेंबर रोजी बाबरी मशीद पाडल्याची घटना कायम लोकांच्या मनात राहील.'
यावेळी ओवैसी (Asaduddin Owaisi), केंद्र सरकार याला लोकसभा निवडणुकीतील मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करेल, मात्र खरा मुद्दा बेरोजगारीचा, महागाईचा आहे. चीनने जमीन हडपली आहे. राम मंदिराबाबत त्यांनी म्हटले की ते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करतात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मथुराच्या शाही ईदगाहास कृष्ण मंदिर घोषित करण्याच्या मागणवरही ओवैसींनी तिखट प्रतिक्रिया दिली. प्लेस ऑफ वर्शिप अॅक्ट संसदेने बनवला आहे. मग मोदी सरकार का म्हणत नाही, की आम्ही यावर ठाम आहोत. तसेच त्यांनी पुढे म्हटले की, '6 डिसेंबर रोजी बाबरी मशीद (Babri Masjid) कोणी शहीद केली? हा प्रश्न आयुष्यभर राहील.'
राम मंदिराबाबत (Ram Temple) विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ओवैसींनी म्हटले की, 'जर तुम्ही मशीद शहीद केली नसती, तर न्यायालयाचा निर्णय का आला असता?, 6 डिसेंबर तर एक वस्तुस्थिती आहे. आपल्याला वाटेल का पुन्हा 6 डिसेंबर घडावं. दुधाने तोंड पोळलं की ताकही फुंकून फुंकून पिलं जातं.'
याअगोदरही ओवेसींचं एक विधान चर्चेत आलं होतं. त्यांनी मुस्लिम समाजातील तरुणांनी उद्देशून पाठिंबा आणि ताकद कायम ठेवण्याचं आवाहन केलं होतं. तसेच म्हटलं होतं की, आपण आपली मशीद गमावली आहे. तिथे काय केलं जात आहे आपण बघत आहोत, याचा तुम्हाला त्रास होत नाही का? ज्या ठिकाणी आपण 500 वर्षे बसून कुराण-ए-करीमचं पठण केलं, ती जागा आज आपल्या हाती नाही. शिवाय, तरुणांनो, आणखी तीन ते चार मशिदींबाबत षड्यंत्र सुरू असून, त्यामध्ये दिल्लीतल्या मशिदीचाही समावेश असल्याचं ते म्हणाले होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.