Karnataka News : अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी सुरू असताना कर्नाटकात एका रामभक्ताला अटक करण्यात आले आहे. राम मंदिराशी संबंधित आंदोलन प्रकरणात तब्बल 31 वर्षानंतर ही अटक करण्यात आल्याने भाजपने कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली आहे. हे सरकार रामभक्ताला जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
राम मंदिरावरून (Ram Mandir) सध्या सत्ताधारी भाजप (BJP) व विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. भाजपकडून राम मंदिराचा राजकीय इव्हेंट केला जात असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यातच कर्नाटक सरकारने (Karnataka Government) एका रामभक्ताला अटक केली आहे. 1992 मध्ये बाबरी मशिदीचा (Babri Masjid) ढाचा पाडल्यानंतर त्याचे पडसाद कर्नाटकातील हुबळीमध्ये उमटले होते.
हुबळीत मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती. त्यामध्ये इतरांप्रमाणेच श्रीकांत पुजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 31 वर्षांनी पुजारी यांना अटक करण्यात आली आहे. भाजपने ही कारवाई चुकीचे असल्याचे म्हटले आहे. जाणीवपूर्वक राम भक्तांना अटक केली जात आहे. त्यांना राम मंदीर खटकत आहे, अशी टीका भाजपने केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुजारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हा ते 20 वर्षांचे होते. त्यांच्यावर दंगलीमध्ये सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आता अचानक अटक करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. याविरोधात भाजपकडून बुधवारी संपूण कर्नाटकमध्ये आंदोलन केले जाणार आहे. पुजारी यांना सोडण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे.
मुख्यमंत्री सिध्दरामैय्या यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एखाद्याने चूक केली असेल तर आण्ही काय करू शकतो? ज्याने गुन्हा केलाय, त्यांना आम्ही मोकळे सोडू का? आमचे सरकार सर्व जुनी प्रकरणे निकाली काढणार आहे. पोलिस कायदयाप्रमाणे काम करत आहे. हे कोणतेही राजकारण नाही. कोणत्याही निर्दोष व्यक्तीला आम्ही अटक केलेली नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.