हिजाब परिधान करणारी मुलगी पंतप्रधान होईल!

हिजाबबाबत एमआयएमचे नेते असुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी मोठ विधान केलं आहे.
asaduddin owaisi
asaduddin owaisisarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : कर्नाटकातील एका कॉलेजातून सुरू झालेला हिजाबबाबतचा (hijab)वाद अद्याप थांबलेला नाही. या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. हिजाबबाबत एमआयएमचे नेते असुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी मोठ विधान केलं आहे.

''हिजाब, नकाब परिधान करुन कॅालेजमध्ये जाईल, कलेक्टरही बनेल, उद्योगपती बनले, एसडीएमही बनेल एक दिवस पंतप्रधानही होईल,'' असे विधान असुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे.

रविवारी सकाळी असुद्दीन ओवेसी यांनी याबाबत टि्वट केलं आहे. ''ईशा-अल्लाह एक दिवस हिजाबी पंतप्रधान बनेल, आम्ही आमच्या मुलींना शुभेच्छा देतो, ईशा अल्लाह, जर त्यांच्या अब्बा-अम्मी यांनी ठरवलं तर त्या हिजाब परिधान करेल. अब्बा-अम्मा म्हणतील, 'बेटा परिधान कर, आम्ही बघतो कोण तुला अडवतो. हिजाब, नकाब परिधान करुन कॉलेजमध्ये जाईल. कलेक्टरही बनेल, उद्योगपती बनले, एसडीएमही बनेल एक दिवस पंतप्रधानही होईल,'' असे असुद्दीन ओवेसी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

शिक्षण संस्थांमध्ये समान वेश अनिवार्य करण्याच्या कर्नाटक सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न काही विद्यार्थ्यांनी केल्यामुळे राज्यातील ‘हिजाब’बाबतचा वाद गेल्या सोमवारी चिघळला. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूरमधील एका महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या मुलींशी प्राचार्यानी चर्चा केली आणि त्यांना सरकारचा आदेश समजावून सांगितला. मात्र विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याचा हट्ट धरल्याने त्यांना त्यांच्यासाठी व्यवस्था केलेल्या एका वेगळय़ा खोलीत बसण्यास सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांचा एक गट याच दिवशी भगव्या शाली घालून मिरवणुकीने आला. त्यांच्या प्राचार्यानी व तेथील पोलिसांनी त्यांना महाविद्यालयाच्या परिसरात येण्यापासून रोखले. हिजाब घातलेल्या मुलींना वर्गात बसण्याची मुभा देण्यात आली, तर आम्ही या शाली घालू असे त्यांनी सांगितले. हिजाब घातलेल्या कुणालाही परवानगी दिली जाणार नाही असे आश्वासन प्राचार्यानी त्यांना दिल्यानंतर त्यांनी शाली काढून वर्गात जाण्याचे मान्य केले.

asaduddin owaisi
'पीए'मुळे बच्चू कडूंना कारावासाची शिक्षा ; गोपाल तिरमारेंमुळे प्रकरण उघडकीस

मंड्या येथील कॉलेजमध्ये मुस्कान खान हिने हिजाब परिधान केला होता यावरुन वाद झाला. काही विद्यार्थ्यांनी तिला पाहून ''जय श्रीराम''च्या घोषणा दिल्या होत्या. यानंतर मुस्कानने 'अल्लाह हो अकबर'चा नारा दिला होता. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून मुस्कान ही चर्चेत आहे. या वादानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणार असल्याचे मुस्कानने कॉलेज प्रशासनाला सांगितले. मालेगाव मध्ये एका घराला मुस्कान हे नाव देण्याचा निर्णय तेथील लोकप्रतिनिधीने घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com