8th Pay Commission Video : सरकारी कर्मचाऱ्यांची बंपर पगार वाढ होणार! PM नरेंद्र मोदींची आठव्या वेतन आयोगाला मंजुरी

PM Modi Approves the 8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टरनुसार सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन हे 6 हजाराहून 18 हजार झाले होते. त्यामुळे आठव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन हे बंपर वाढणार आहे.
8th Pay Commission
8th Pay Commission sarkarnama
Published on
Updated on

8th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुशखबर दिली आहे. केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना केल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.

1847 पासून आत्तापर्यंत सात वेतन आयोगाला सरकारने मंजुरी दिली होती. आता आठव्या वेतन आयोगाला सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

सातवा वेतन आयोग 2016 साली लागू करण्यात आला होता. त्यानुसार आता 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होईल. 2025 मध्ये या वेतन आयोगाला मंजुरी दिल्याने संपूर्ण प्रक्रिया राबवण्यासाठी अवघा एक वर्षाचा कालावधी मिळतो आहे.

8th Pay Commission
Devendra Fadnavis: गृहमंत्रीसाहेब, बीड ते बांद्रा...राज्यात चाललंय काय !

बेसिक वेतन 54 हजारावर

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये बंपर वाढ होणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार कर्मचाऱ्यांचा मूळ पगार (बेसिक वेतन) हे तब्बल 54 हजार 480 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. पेन्शनधारकांनाही या वेतन आयोगानुसार फायदे देखील मिळतील. तर, सध्या ज्यांना 9 हजार पेन्शन मिळत आहे त्यांना 25 हजार 740 रुपये पेन्शन मिळेल.

फिटमेंट फॅक्टर 2.86

सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेंन्शन वाढवण्याचा फाॅर्म्युला फिटमेंट फॅक्टर आहे. फिटेमंट फॅक्टरनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर वाढ केली जाते. सातवा वेतन आयोग लागू केला होता तेव्हा फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. आठव्या वेतन आयोगाच्या वेळी फिटमेंट फॅक्टर 2.86 असण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टरनुसार सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन हे 6 हजाराहून 18 हजार झाले होते.

8th Pay Commission
Kolhapur Poltics News : डीपीडीसीवरून इच्छुकांची घालमेल; आतापासूनच गुडघ्याला बाशिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com