Petrol and Diesel prices
Petrol and Diesel prices

पेट्रोल दोनशेवर गेल्यास टू-व्हिलरवर ट्रिपल सीटला परवानगी! भाजप प्रदेशाध्यक्षांची मोठी घोषणा

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

मुंबई : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चालू महिन्यात 15 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता विमान इंधनापेक्षा (Aviation Turbine Fuel) पेट्रोल 33 टक्क्यांनी महाग झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) प्रदेशाध्यक्षांनी मोठी घोषणा केली आहे.

आसामचे भाजप प्रदेशाध्यक्ष भावेश कलिता यांनी ही घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणाले की, पेट्रोलचा दर प्रतिलिटर 200 रुपयांजवळ पोचल्यानंतर राज्यात दुचाकीवर ट्रिपल सीट जाण्यास आसाम सरकार परवानगी देणार आहे. पेट्रोल 200 रुपयांवर गेल्यानंतर आम्ही दुचाकीवर ट्रिपल सीट जाण्यास परवानगी देऊ. याचबरोबर तिघे बसू शकतील, अशा दुचाकींचे उत्पादनही घेण्याची सूचना केली जाईल.

लोक इंधन बचतीसाठी लक्झरी कार चालवण्याऐवजी एकाच दुचाकीवर तिघे बसून जाण्यास प्राधान्य देतात, असे विधान कलिता यांनी केले होते. यावरून गदारोळ उडाल्यानंतर त्यांनी हा खुलासा केला आहे. दुचाकीवर ट्रिपल सीट अधिकृतपणे जाण्यास परवानगी देण्याची सरकारी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. यासाठी त्यांनी पेट्रोलचा दर प्रतिलिटर 200 रुपयांच्या जवळ जाण्याची अट घातली आहे. त्यांच्या या अजब घोषणेवरूनही आता वाद सुरू झाला आहे.

Petrol and Diesel prices
भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरूद्ध तक्रार अन् राहुल गांधी आरोपी

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढल्याने पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम राहण्याची शक्यता आहे. खनिज तेलाचे भाव मागील सात वर्षांतील उच्चांकी पातळी आहेत. खनिज तेलाचा भाव वाढल्याने आगामी काळात देशात इंधन दरवाढीचे चक्र कायम राहणार आहे. आगामी काळात हे चटके आणखी वाढण्याची शक्यता आहे. चालू महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 दिवस वाढ करण्यात आली आहे.

Petrol and Diesel prices
कर्नाटकात राजकीय बॉम्ब : भाजपच्या येडियुरप्पांसह काँग्रेसचे शिवकुमारही अडचणीत

देशात पेट्रोलचा दर विमान इंधनापेक्षा 33 टक्के जास्त आहे. विमान कंपन्यांना ज्या दरात इंधन विकले जाते त्यापेक्षा 33 टक्के जास्त दराने वाहनचालक पेट्रोलची खरेदी करीत आहेत. विमान इंधनाचा दर दिल्लीत प्रतकिलोलीटर 79 हजार 20 रुपये म्हणजेच 79 रुपये लिटर आहे. यामुळे देशात आता विमान चालवण्यापेक्षा वाहन चालवणे महाग झाल्याची टीका होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com