१२५ तासांच्या रेकॉर्डिंगसाठी पवारांनी थोपटली फडणविसांची पाठ, म्हणाले...

Sharad Pawar | Devendra Fadanvis : काल देवेंद्र फडणविस यांनी सादर केलेल्या १२५ तासांच्या रेकॉर्डिंगबद्दल शरद पवारांनी देवेंद्र फडणविसांचे कौतुक केले.
Devendra Fadnavis-sharad Pawar | Sharad Pawar News Updates
Devendra Fadnavis-sharad Pawar | Sharad Pawar News Updatessarkarnama

मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस (Devendra Fadnavis) यांनी काल विधानसभेत केलेल्या सादर केलेल्या व्हिडिओ बॉम्बनंतर आणि आरोपांनंतर महाविकास आघाडीचे नेते सावध प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. या आरोपानंतर आज दिवसभर सभागृहात नेमकी काय भूमिका घ्यायची याची चर्चा महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) नेते करताना दिसून येत आहेत. दरम्यान याच प्रकरणावर बोलताना, मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्राची सत्ता हातातून गेल्यामुळे केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन शासन अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याला यश येत नाही, त्यामुळे ही टोकाची भूमिका घेतली असावी म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फडणविसांवर निशाणा साधला आहे. (Sharad Pawar News Updates)

शरद पवार म्हणाले, ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलेलो नाही. त्यांनी केलेले आरोप खरे की खोटे याची चौकशी राज्य सरकार करेलचं. पण मला काही गोष्टींचे कौतुक वाटले. एका शासकीय वकिलाच्या कार्यालयामध्ये जावून जवळपास १२५ तासांचे रेकॉर्डिंग करण्यात देवेंद्र फडणविस किंवा त्यांचे अन्य कोणी सहकारी यशस्वी झाले. मात्र १२५ तास रेकॉर्डिंग करायचे म्हटले तर ते रेकॉर्डिंगची प्रक्रिया किती दिवस चालली याचा विचार करायला हवा, आणि त्यासाठी कोणत्या तरी शक्तिशाली तपास यंत्रणेचा वापर केला असण्याची शक्यता आहे, आणि अशा यंत्रणा केवळ भारत सरकारकडे आहेत. हे सिद्ध व्हायला हवं यासाठी राज्य सरकार नक्कीच तपास करेल.

Devendra Fadnavis-sharad Pawar | Sharad Pawar News Updates
राऊतांचा लढा आणखी तीव्र होणार; राहुल गांधींनी मांडली काँग्रेसची भूमिका

मात्र, सार्वजनिक जीवनात कोणी व्यक्ती तक्रार करत असेल तर त्याबाबत शहानिशा करायला हवी. कोणीतरी तक्रार करायची आणि त्यानंतर यंत्रणांनी लोकप्रतिनीधींचा तपास करायचा आणि त्यातून सत्ताधाऱ्यांना नाउमेद करायचे. विशेषत: महाराष्ट्र आणि बंगालमध्ये हे प्रकार अधिक आहेत. उदाहरण, अनिल देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आधीच्या पोलिस अधिकाऱ्याने तक्रार केली. त्यानंतर देशमुखांना जेलमध्ये जावे लागले. सत्तेचा गैरवापर करुन चौकशी कशी केली जाते, याचे देशमुख जिवंत उदाहरण आहेत.

Devendra Fadnavis-sharad Pawar | Sharad Pawar News Updates
फडणवीसांच्या 'स्टिंग ऑपरेशन'वर चव्हाण म्हणाले,'' व्हिडीओतील फेरफार बाहेर येईल''

माझ्याकडे माहिती आहे की, देशमुख यांच्या जवळच्या तब्बल ९७ लोकांकडे छापेमारी झाली. २०० लोकांशी चौकशी केली. यात ईडीचे ५०, सीबीआयचे २०, आयकरचे २० असे एका व्यक्तीच्या संबंधात इतके छापे टाकण्यात आल्याचे प्रशासनामध्ये कधी मी ऐकले किंवा पाहिले नव्हते. एवढे छापे टाकूनही काही साध्य होत नसताना आणखी त्रास कशापद्धतीने देता येईल, याचे मार्ग शोधण्यात आले. नवाब मलिकांबाबतची केस किती जुनी आहे? तरी ती उकरून काढण्यात आली. याबाबत राज्य सरकार आणि गृहखाते चौकशी करेल, असा मला विश्वास आहे. पुरेपुर गैरवापर करु शासन अस्थिर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com