Assembly Election 2024 : जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक कधी? आयोगाकडून मोठे संकेत...

 Election Commission : निवडणूक आयोगाने चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. मात्र, जम्मू आणि काश्मीरची निवडणूक जाहीर न झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Assembly Election 2024
Assembly Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीसह (Lok Sabha Election 2024) चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2024) कार्यक्रम जाहीर केला. आयोगाकडून आज जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या जातील, अशी अपेक्षा होती. पण तसेच काहीच झाले नाही. ही निवडणूक कधी होणार, याचे संकेत केवळ आयोगाने दिले.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv kumar) यांनी आज निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. आंध्र पद्रेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही लोकसभेबरोबरच घेतल्या जाणार आहेत. यातून जम्मू आणि काश्मीरला (Jammu and kashmir) वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे या राज्यांत मागील दहा वर्षे निवडणूक झालेली नाही.

Assembly Election 2024
Lok Sabha Election 2024 : कोणत्या राज्यात किती टप्प्यात होणार मतदान? वाचा सविस्तर...

जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. 2018 मध्ये भाजप (BJP) आणि पीडीपीची सत्ता गेल्यानंतर आयोगाने निवडणूक घेतली नाही. आज याविषयी बोलताना राजीव कुमार यांनी सुरक्षेचे कारण दिले. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निकालाचाही हवाला दिला.

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला जम्मू आणि काश्मीरमध्ये 30 सप्टेंपरच्या आत निवडणूक घेण्याचे आदेश मागील वर्षी डिसेंबर महिन्यात दिले आहेत. त्यामुळे आयोगाकडून लोकसभा व इतर चार राज्यांच्या निवडणुकीसोबत जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे टाळले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या राज्यात विधानसभेची निवडणूक घेतली जाईल, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिल, दुसरा 26 एप्रिल, तिसरा 7 मे, चौथा 13 मे आणि पाचवा 20 मे रोजी आहे. या राज्यात लोकसभेच्या पाच जागा आहेत, तर लडाखमध्ये एक लोकसभा मतदारसंघ आहे. कलम ३७०

कलम 370 हटवल्यानंतर पहिली निवडणूक

जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर राज्यात लोकसभेची पहिलीच निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मोदी सरकारने 2019 मध्ये सत्तेत आल्यानंतर काही दिवसांतच हे कलम हटवत जम्मू आणि काश्मीरपासून लडाख वेगळे केले. तसेच त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे.

R

Assembly Election 2024
Lok Sabha Election 2024 : बिगुल वाजला; इलेक्शन कमिशनकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com